दिल्ली डायरी: ३! राजकीय धामधुमीत खा. प्रतापराव जाधव दिल्लीत! घेतली 'ही' बैठक ! 'त्या दोघांच्या' मनपरिवर्तनचे प्रयत्न सुरूच !! बुलडाणा लाइव्हसाठी संजय मोहिते थेट नवी दिल्लीवरून!

 
बुलडाणा ( संजय मोहिते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शिवसेनेतील महा बंडाळी मध्ये जिल्ह्यातील २ आमदार प्रथमपासूनच सहभागी असल्याने   व त्यांची मनधरणी करण्याची जवाबदारी मातृतीर्थ  बुलडाणा जिल्ह्याचे खासदार  प्रतापराव जाधव यांच्यावर असल्याने स्थानिक शिवसैनिक ते 'मातोश्री' च्या नजरा लागल्या आहे. ही धामधूम सुरू असतानाच खा. जाधव बुधवारी ( दि २२) संध्याकाळी या धक्कादायक राजकीय घडामोडीचा एक केंद्रबिंदू असलेल्या राजधानी दिल्लीत पोहोचल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे राजकीय प्रामुख्याने सेना वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहे. मात्र  प्राप्त माहितीनुसार राजकीय भूकंपाशी  त्यांच्या या तातडीच्या दिल्ली वारीचा सध्यातरी संबंध नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

चाणक्य नितीत निपुण अन राजकीय आखाड्यात भल्या भल्यांची मस्ती जिरविणाऱ्या या मुत्सद्दी नेत्याची ही भेट एका प्रसाशकीय बैठकीनिमित्त आहे . ते अध्यक्ष असलेल्या केंद्रीय ग्राम विकास समितीची बैठक आज (२३ जूनला) बैठक आहे. ही बैठक महत्वपूर्ण असल्याने राजकारण सोडून  ते  मुंबई वरून दिल्लीत दाखल झाले. या बैठकीनंतर लगेच पुन्हा दुसरी बैठक लावण्यात आली आहे. यामुळे आज संध्याकाळीच ते  प्रसाशकीय कामातून मोकळे होणार असे चित्र आहे.

मिशन मनधरणी

यापूर्वी बुधवारी संध्याकाळी उशिरा दिल्लीत दाखल झाल्यावर ते आपल्या अशोका रोडवरील बंगल्यात पोहोचले. दोन बैठका आटोपून ते राजकीय मनधरणी च्या कामाला लागणार हे उघड आहे. त्यात ते यशस्वी होतात काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री पासून एक फोकस खा. जाधव यांच्यावरही राहणार आहे.