जिल्हाभरातील "भावी" नेत्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी! जिल्हाधिकाऱ्यांसमोर एकापोठापाठ एकाची हजेरी..! कारण आहे खास..
बुलडाणा जिल्ह्यातील ९ नगरपालिकांच्या मुदत जानेवारी महिन्यातच संपली असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना कार्यक्रम नव्याने हाती घेतला आहे. चिखली पालिकेची हद्दवाढ झाल्याने नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. त्यामुळे चिखली वगळून अन्य ८ पालिकांच्या प्रभाग रचनावर मागील १० ते १४ मे दरम्यान नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या . बुलडाणा, मलकापूर मध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ११ ( एकूण २२ ) हरकती प्राप्त झाल्या. मेहकर, देऊळगाव राजा व खामगाव मध्ये प्रत्येकी ४ मिळून १२, शेगाव मध्ये ५ तर जळगाव जामोद मध्ये केवळ एकच हरकत प्राप्त झाली. नांदुरा मध्ये एकही हरकत प्राप्त झाली नाहीये!
जिल्हाधिकारी कक्ष परिसर गजबजला
यापूर्वी घोषित कार्यक्रमानुसार बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर आणि मलकापूर मधील हरकतींवर १८ मे तर शेगाव, जळगाव जामोद, खामगाव मधील हरकतीवर १९ तारखेला सुनावणी होणार होती. मात्र जिल्हाधिकारी साक्षीसाठी दिल्लीला गेले असल्याने आज, सोमवारी ७ पालिकांची सुनावणी करण्याचे नियोजन करण्यात आले. कमीअधिक ४० हरकती असल्याने जिल्हाधिकारी कक्ष परिसर गजबजल्याचे दिसून आले.