खामगावात काँग्रेसमध्ये दुफळी! जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षांचे ज्ञानेश्वर पाटलांवर गंभीर आरोप ; म्हणाल्या तुमच्या "त्या" कृत्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या!
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतून माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी माघार घेतल्याने काँग्रेसने ज्ञानेश्वर पाटील यांना रिंगणात उतरवले होते. मात्र आकाश फुंडकर यांनी त्यांचा पराभव केला होता. ज्या आकाश फुंडकरांनी सदैव काँगेस पक्ष ,गांधी परिवार व काँग्रेस नेत्यांवर आगपाखड करून काँग्रेसची बदनामी केली. खामगाव पोलिसांवर राजकीय दबाव आणून अनेक वेळा काँग्रेस नेत्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले.
खुद्द ज्ञानेश्वर पाटील यांच्या बायोडिझेलच्या व्यवसायाविरुद्ध विधानसभेत आवाज उठवला त्या आकाश फुंडकरांना गाडीवर बसवून त्यांच्या सोबत ज्ञानेश्वरदादांनी सेल्फी काढली ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनाला वेदना देणारी आहे असेही सरस्वतीताई खासने यांनी म्हटले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी रक्ताचे पाणी करून अवघ्या १५ दिवसांत ज्ञानेश्वर पाटलांना ७३ हजारांपेक्षा जास्त मते मिळवून दिली मात्र याची जाण त्यांना नाही. आपला बायोडिझेलचा व्यवसाय सुरळीत चालावा, कुणी तक्रारी करू नये यासाठी तर ज्ञानेश्वरदादांनी आमदार फुंडकरांना गाडीवर मिरवले नाही ना असा प्रश्नही सरस्वतीताई खासने यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले...
या संदर्भात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांना तुम्ही सरस्वतीताई खासने यांनी केलेल्या आरोपांशी सहमत आहात का अशी विचारणा केली असता याबद्दल आपल्याला अजून माहिती नसून प्रकरणाची माहिती घेतो असे ते म्हणाले..