तरुणांना रोजगार देण्यास कटिबध्द; रोजगार मेळाव्यात श्वेताताई महाले पाटील यांनी दिला शब्द!
४ मे २०२२ रोजी श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून चिखलीच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड चाकण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . मेळाव्याचे आमदार महाले पाटील यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे केले .गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे बेरोजगारी वाढलेली होती. त्यासाठी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्किल इंडिया योजनेत प्रत्येक सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेमार्फत प्रशिक्षण देऊन चांगल्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. त्यांच्या संकल्पनेतून चिखली विधानसभा मतदारसंघाही उत्तम दर्जाचे कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन भविष्यातही रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल व त्या ठिकाणी चांगल्या कंपन्यांना आमंत्रित करून आपण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असेही आश्वासन यावेळी त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखलीचे आय. एम. सी. अध्यक्ष सुधीर तांबट. प्रमुख उपस्थिती अंकुशराव पाटील हे उपस्थित होत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री सोनुने यांनी तर प्रास्ताविक श्री बेदरकर व आभार प्रदर्शन अंभोरे यांनी केले. या कार्यक्रमाला मुलाखतीसाठी२३५ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यापैकी त्याच दिवशी ११५ उमेदवारांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.