हत्तीरोगाच्या मुद्यावरून आ. डॉ.राजेंद्र शिंगणे आक्रमक! अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):राज्याचे माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा सिंदखेडराजाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज पावसाळी अधिवेशनात हत्तीरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मुद्दा उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. यामुळे आरोग्यमंत्री  तानाजी सावंत चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून आले. 

आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हत्तीरोगाचा प्रादुर्भाव झाला असून राज्यातही असेच चित्र असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या विषयावर मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सिंदखेडराजा चे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज हा मुद्दा उचलून धरला. पालघरच नव्हे राज्यात अनेक जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव झाला असून  रुग्णसंख्या वाढली आहे.

  सभापती नार्वेकर यांनीही याची गंभीर घेतली. दरम्यान डॉ. शिंगणे यांनी थेट आरोग्य विभागाला धारेवर धरले. तसेच संपूर्ण राज्यात याची तपासणी करण्यात आली का? आजवर किती रुग्ण आढळून आले? यावर काय व कशी उपाय योजना करण्यात आली असा प्रश्नांचा भडिमार आ. शिंगणे यांनी केला. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी याआधी आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळलेली असल्याने या विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. डॉ. शिंगणेंच्या या प्रश्नावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून आले.