खासदार प्रतापराव जाधवांना केंद्र सरकारचे गिफ्ट! दिली "ही" महत्वाची जबाबदारी...!!
जाहिरात
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभेचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. सध्या केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष असलेल्या खा. प्रतापराव जाधव यांच्याकडे आणखी एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संसदेच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (माहिती तंत्रज्ञान) विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेच्या स्थायी समितीतील काही महत्वाचे बदल केंद्र सरकारकडून करण्यात आले आहेत. यात शिवसेनेच्या खा. प्रतापराव जाधव यांना संधी देण्यात आली आहे. प्रतापराव जाधव हे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून सलग तीनदा लोकसभेवर निवडून आले असून त्याआधी तीनदा आमदार व महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्रीपद सुद्धा भूषवले आहे.
जाहिरात
विशेष म्हणजे काही दिवसांआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांची काही दिवसाआधी शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती केली आहे. केंद्र सरकारने प्रतापराव जाधव यांना दिलेल्या नव्या जबाबदारीमुळे बुलडाणा जिल्ह्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.