बुलडाणा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर! दहापैकी ४ सरपंच भाजपा - शिंदे गट, ५ सरपंच महाविकास आघाडीचे

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील दहाही ग्रामपंचायतींचे निकाल आज,२० डिसेंबरच्या दुपारपर्यंत हाती आले आहेत. आमदार संजय गायकवाडांच्या या गडात मात्र महाविकास आघाडीचाच दबदबा असल्याचे चित्र आहे. १० पैकी ५ जागांवर महाविकास आघाडी तर ४ जागांवर भाजपा व शिंदे गट तर एका जागा इतरांच्या खात्यात गेली आहे.

 दत्तपुर येथे काँग्रेस पुरस्कृत संदीप संतोष कांबळे सरपंच पदी विराजमान झाले आहेत. गिरडा येथे महाविकास आघाडीच्या सौ.सुनीता सुरेश गायकवाड,  मोंढाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता तुळशीराम काळे, सव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत इंदुबाई विकास शेळके, रुईखेड मायंबा येथे काँग्रेस पुरस्कृत अनिल श्यामराव फेपाळे सरपंच पदी विजयी झाले आहेत. येळगाव येथे भाजप पुरस्कृत दादाराव लवकर, इरला येथे काँग्रेस पुरस्कृत मोहन खंडागळे,  चिखला येथे भाजपा पुरस्कृत पराग राजेंद्र वाघ तर उमाळा येथे शिंदे गटाचे पंडित सपकाळ सरपंच झाले आहेत.  सुंदरखेड ग्रामपंचायतीत अपक्ष अपर्णा राजेश चव्हाण सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.