Breaking जिल्हा परिषद प्रभाग रचनांची तपासणी सुरू! तेरा तहसीलचे कर्मचारी भिडले कामाला!!
आयोगाच्या नवीन आदेशानुसार जिल्हाधिकारी यांना २३ मे पर्यंत रचनेचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावे लागणार आहे . ३१ मे पर्यंत आयुक्त याला मान्यता देणार असून २ जूनला जिल्हाधिकारी याला प्रसिद्ध करणार आहे. या रचनावर जिल्हाधिकारी यांच्याकडे २ ते ८ जून दरम्यान हरकती व सूचना सादर करता येतील. सुनावणी अंती विभागीय आयुक्त जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गण २२ जून पर्यंत अंतिम करतील. २७ ला अंतिम प्रभाग रचना राजपात्रात प्रसिद्ध करण्यात येईल.
हा व्यस्त कार्यक्रम लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडनिवडणूक विभाग व १३ तहसीलमधील निवडणूक कक्षाचे कर्मचारी आजपासून कामाला भिडल्याचे चित्र आहे. स्थानिय निवडणूक विभागात आज शुक्रवारी सकाळ पासून ६८ जिल्हापरिषद गट आणि १३६ पंचायत गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी, पडताळणी करण्याचे कामास प्रारंभ झाला आहे. आरडीसी दिनेश गीते, उपजिल्हाधिकारी ( निवडणूक) गौरी सावंत, नायब तहसीलदार सुनील आहेर यांच्या मार्गदर्शनात ही तपासणी करण्यात येत असून संभाव्य त्रुटी शोधण्याचे काम करण्यात येत आहे. या पडताळणी अंती जिल्हाधिकारी २३ मे पर्यंत रचनेचे प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे सादर करणार आहे.