बिग ब्रेकिंग! १२१ प्रभागांच्या रचना प्रसिद्ध; हरकतींसाठी १७ मार्चची मुदत : २२ मार्चपर्यंत जिल्हाधिकारी करणार सुनावणी; २४६ सदस्यपदासाठी लवकरच लढती
राज्यातील २०८ पालिकांचा रणसंग्राम चालू वर्षात रंगणार आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मलकापूर, जळगाव जामोद, खामगाव, नांदुरा, मेहकर, देऊळगाव राजा, शेगाव या पालिकांचा समावेश आहे. या पालिकांची मुदत जानेवारीमध्येच संपली असून त्यावर प्रशासक नेमण्यात आले आहेत. डिसेंबरमध्ये पालिका क्षेत्रातील राजकीय हालचाली वाढल्या होत्या. मात्र नंतर कार्यक्रम निश्चित नसल्याने त्यांना ब्रेक लागला. मात्र आता पुन्हा या हालचालींना वेग येणार आहे.
प्रभाग वाढ नाही!
दरम्यान, आज करण्यात आलेली प्रसिद्धी लक्षात घेतली तर एकाही पालिकेत प्रभाग वाढ झाली नसल्याचे दिसून येते. नगर प्रशासन विभागाच्या सूत्रांनी याला पुष्टी दिली. दुसरीकडे ९ पालिकांत १२१ प्रभाग राहणार असून, सदस्यसंख्या २४६ इतकी राहणार आहे. देऊळगाव राजा (प्रभाग १०, २१ सदस्य) नांदुरा (प्रभाग १२, सदस्य २५), खामगाव (प्रभाग १७, सदस्य ३५) , जळगाव जामोद (प्रभाग १०, सदस्य २१) या पालिकेतील १ प्रभाग त्रिसदस्यीय राहणार आहे. या तुलनेत बुलडाणा (प्रभाग १५), चिखली ( प्रभाग १४), मेहकर (प्रभाग १३), मलकापूर (१५), शेगाव (१५) पालिकेतील सर्व प्रभाग द्विसदस्यीय आहेत.