BULDANA LIVE SPECIAL जिल्हा परिषद प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर! आयोगाचे आदेश; जून अखेर अंतिम शिक्कामोर्तब!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऍक्टिव्ह मोड वर आलेल्या राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद पाठोपाठ आता जिल्हा परिषदांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला असून  जून अखेर रचनावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे

आयोगाच्या नवीन आदेशानुसार जिल्हाधिकारी यांना २३ मे पर्यंत प्रभागरचना विभागीय आयुक्तांकडे सादर करावी लागेल. ३१ मे पर्यंत आयुक्त याला मान्यता देणार असून २ जूनला जिल्हाधिकारी याला प्रसिद्ध करणार आहे. या रचनांवर जिल्हाधिकारी यांच्याकडे २ ते ८ जून दरम्यान हरकती व सूचना सादर करता येतील.  सुनावणी अंती  विभागीय आयुक्त  जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गण २२ जून पर्यंत अंतिम करतील. २७ जूनला अंतिम प्रभाग रचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

राहणार 68 प्रभाग

 बुलडाणा जिल्ह्यापुरते सांगायचे झाल्यास वाढीव लोकसंख्येमुळे बुलडाणा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या आता ६८ इतकी झाली आहे. यामुळे पूर्वीचा प्रभाग रचनेचा आराखडा रद्द करण्यात येऊन वाढीव संख्येनुसार नवीन आराखडे तयार करण्यात आले. १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत  या आराखड्याच्या तपासणीचे काम सुरू झाले होते. मात्र ही प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र ४ मे रोजीच्या सुप्रिम आदेशामुळे आता प्रभाग रचना- पार्ट २ चे काम नव्याने युद्धस्तरावर हाती घेण्यात आले आहे.