ट्रॅक्टर निशाणीवर निवडुन येताच घेतले नवीन ट्रॅक्टर!पॅनल प्रमुखांचा नादच खुळा !

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निवडणूक जिंकण्यासाठी कोण काय करतील आणि निवडणूक जिंकल्यावर देखील कोण काय करेल? हे देखील सांगता येत नाही. चक्क ट्रॅक्टर निशाणीवर उमेदवार निवडुन येताच पॅनल प्रमुखाने नवीन ट्रॅक्टर खरेदी केले.त्यामूळे 'नादच खुळा' असं म्हणावे लागेल!

जिल्ह्यासह रानअत्रीची  निवडणूक १८ डिसेंबरला पार पडली काल ,२० डिसेंबरला निवडणूक निकाल जाहीर झाला. या अटीतटीच्या लढतीत तात्याराव झालटे यांनी विद्यमान सरपंच संदीप झालटे यांचा पराभव करीत निवडणूक जिंकली. निवडणुकीत विजयी होताच पॅनलचे मुख्य सदस्य असलेले वसंतराव झालटे यांनी त्याच दिवशी ट्रॅक्टर हे निवडणूक चिन्ह असलेले वाहन खरेदी केले. निकाल लागताच पॅनलच्या प्रमुखांनी नवीन ट्रॅक्टर घेत आमचा नाद करायचा नाय,असा इशारा तर विरोधकांना दिला नाही ना अशी चर्चा गावात होत आहे.