पाकिस्तानच्या बिलावर भुट्टोच्या प्रतिमेला मारले जोडे! नरेंद्र मोदींविरोधात अपशब्द वापरल्याने संतापाची लाट; भाजपचे शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा म्हणाले,हा तर सुर्यावर थुंकण्याचा प्रकार..!!
भाजपच्या वतीने जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निषेध म्हणून भुट्टो यांच्या प्रतिमेला जोड्याने मारून, प्रतिमा जाळण्यात आली. यावेळी निषेधार्थ घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
येथील भाजपा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा शहर अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांच्या अध्यक्षतेत निषेध आंदोलन करण्यात आले. ज्या दुर्दैवी घटनेबद्दल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नरेंद्र मोदी यांना निर्दोष सिद्ध केलेले आहे. आणि यानंतर भारतीय जनतेने वारंवार नेतृत्व देउन त्यांच्यावर कायम विश्वास ठेवला आहे.अशा महान व्यक्ती बद्दल गैर शब्द वापरणे हा त्यांची प्रतिमा अकारण डागाळण्याचा केविलवाना प्रयत्न आहे, असे निषेध नोंदविताना सिद्धार्थ शर्मा म्हणाले. ज्या देशाने आतंकवादाचा कारखाना काढून संपूर्ण जगामध्ये लाखो निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे.
ज्यामुळे आज त्या देशाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.अशा देशाच्या एका भिकारकोट मंत्र्यांनी नरेंद्र मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, असेही शर्मा म्हणाले.दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांच्या प्रतिमेला जोडे, चपला मारून निषेध करण्यात आला. संतप्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बिलावर भुट्टो जरदारी व पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दिले. तसेच बिलावल भुट्टो जरदारी याची प्रतिमा जाळून निषेध केला.
भाजपा तालुका सरचिटणीस डॉ.राजेश्वर उबरहंडे,भाजपा शहर सरचिटणीस आशिष व्यवहारे,भाजपा तालुका सरचिटणीस ऍड.दशरथसिंह राजपूत,विश्राम पवार,भाजपा शहर उपाध्यक्ष नितीन बेंडवाल, सचिन टेम्भिकर, नितीन श्रीवास,नितीन दासर, प्रितेश बेदमुथा,सचिन जोशी,प्रदीप बेगाणी,वैभव इंगळे,अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष आसिफ,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सतिश पाटील,भाजपा युवा मोर्चा शहर सरचिटणीस मोहित भंडारी, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष वर्षा पाथरकर,महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया पदमने, भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस उषा पवार, सविता रोकडे,विठ्ठल ठेंग,शरद जैन,भाजपा सोशल मीडिया प्रमुख तेजस भंडारी,सचिन सुर्यवंशी ,भाजपा जैन प्रकोष्ठ शहराध्यक्ष शुभम कोठारी,भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष महेश तलवारे,अक्षय छाजेड,ऋषिकेश गोरे,अनिकेत गवळी,श्रीकृष्ण मख यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते निषेध आंदोलनात सहभागी झाले होते.