२२ मुस्लिम शाह समाजाचा विधानभवनावर मोर्चा! मुस्लिम शाह समाजाने एकवटून आपला हक्क मागायचा आहे; जाकीर शाह यांचे प्रतिपादन

 
डोणगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुस्लिम समाजात नेहमी भटकंती करणारा शिक्षण असो की प्रत्येक बाबी मध्ये मागासलेला समाज म्हणून फकीर शाह समाज आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचे कवच गरजेचे आहे . या मागणी साठी हिवाळी अधिवेशनात  २२ मार्च रोजी आक्रोश मोर्चा निघणार आहे. यात सहभागी होण्यासाठी मुस्लिम शाह  समाजाने एकवटून समोर यावे ,यासाठी गावोगावी मेळावे घेऊन जनजागृती केली जात आहे . असाच एक मेळावा १८ डिसेंबरच्या संध्याकाळी दिलदार शाह यांच्या अध्यक्षतेत डोणगाव येथे घेण्यात आला होता.

डोणगाव येथील मुस्लिम शाह समाज मेळाव्याचे अध्यक्षस्थानी दिलदार शाह तर प्रमुख उपस्थिती मध्ये  केजी शाह, जाकीर शाह नांद्रा कोळी, हाजी इबाद शाह,बशीर शाह, जाकीर शाह, सुभान शाह, रहीम शाह सा. खेर्डा, सद्दाम शाह काठठू शाह, डॉ. सद्दाम शाह,फिरोज शाह मेहकर,हमजा शाह हे होते.कार्यक्रमाची प्रस्तावना अस्लम अली शाह यांनी केली.

बिलाल शाह यांनी सध्यस्थिती मध्ये समाज कोठे आहे यावर विचार व्यक्त केले. तर  जाकीर शाह  यांनी समाजाला दिशा देऊन आरक्षणचे कवच मिळायला हवे यासाठी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वात निघणाऱ्या मोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.  यावेळी उमर फारूक, सद्दाम शाह, हुसेन शाह हैदर शाह, फिरोज शाह, केजी शाह, दिलदार शाह यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन उमर फारुख यांनी केले तर कार्यक्रमासाठी विशेष असे सहकार्य बशीर शाह,हुसेन शाह ठेकेदार, हुसेन शाह हैदर शाह, बिलाल शाह,नसरोद्दीन शाह,उमेर शाह,युनूस शाह यांनी केले. कार्यक्रमाला शेलगाव देशमुख, पिंप्री सरहद्द, मेहकर या ठिकाणावरून शाह समाज बांधव उपस्थित झाले होते.