“लखीमपूर’मुळे प्रथमच एकवटले महाविकास आघाडीचे नेते!; उद्याच्‍या बंदमध्ये सहभागाचे आवाहन

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ (योगायोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर) जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते एकत्र आल्याचे काल, १० ऑक्टोबरला दिसून आले. घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी …
 
“लखीमपूर’मुळे प्रथमच एकवटले महाविकास आघाडीचे नेते!; उद्याच्‍या बंदमध्ये सहभागाचे आवाहन

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लखीमपूरच्‍या घटनेच्‍या निषेधार्थ (योगायोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर) जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते एकत्र आल्याचे काल, १० ऑक्‍टोबरला दिसून आले. घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी बुलडाणा जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.

केंद्रीय गृहराज्यमंत्री यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, आठ शेतकऱ्यांचा आपल्या वाहनाने चिरडून बळी घेणाऱ्या त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हे दाखल करून अटक करावी तसेच शेतकरीविरोधी असलेले तीन काळे कायदे रद्द करावेत, यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना आहे. त्यामुळे जिल्हावासीयांनी कडकडीत बंद पाळून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा आवाज केंद्र सरकारच्या कानापर्यंत पोहोचवा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. यावेळी काँग्रेस आमदार राजेश एकडे, सेनेचे आमदार संजय गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह आघाडीतील तीन पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.