“युवा वॉरियर्स’चे चिखलीत भगवे वादळ!; “भाजयुमो’ प्रदेशाध्यक्षांनी भरले चैतन्य!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः युवकांना भारतीय जनता पार्टीच्या युवा वाॅरियर्समध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होऊ शकते. युवकांना त्यांच्या आवडीनुसार काम करण्याची संधी देऊन चिखली विधानसभेत युवकांचे भगवे वादळ निर्माण करण्याचे आवाहन भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी चिखली येथे युवा वाॅरियर्स मेळाव्यात केले. आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली काल, २३ ऑगस्टला श्रीराम नागरी …
 
“युवा वॉरियर्स’चे चिखलीत भगवे वादळ!; “भाजयुमो’ प्रदेशाध्यक्षांनी भरले चैतन्य!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः युवकांना भारतीय जनता पार्टीच्या युवा वाॅरियर्समध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होऊ शकते. युवकांना त्यांच्या आवडीनुसार काम करण्याची संधी देऊन चिखली विधानसभेत युवकांचे भगवे वादळ निर्माण करण्याचे आवाहन भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी चिखली येथे युवा वाॅरियर्स मेळाव्यात केले.

आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली काल, २३ ऑगस्‍टला श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या जिजाऊ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात व्‍यासपीठावर भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा प्रदेश युवा मोर्चा प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कणेरकर, प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ, बादल कुळकर्णी, विशाल केचे, प्रदीप देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख, पंजाबराव धनवे पाटील, विजय वाळेकर, चेतन देशमुख, पंडित देशमुख, रामदास देव्हडे, सौ. सिंधूताई खेडेकर, सुनिताताई भालेराव, सभापती सौ. सिंधुताई तायडे, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, अॅड. सुनील देशमुख, संतोष काळे पाटील, मनीषाताई सपकाळ, विजय नकवाल, गोविंद देव्हडे, नामू गुरुदासनी, सुभाषअप्पा झगडे, सुरेंद्रप्रसाद पांडे, सुहास शेटे, प्रा. विरेंद्र वानखेडे, सचिन कोकाटे, युवराज भुसारी, शैलेश बाहेती, अर्चनाताई खबुतरे, जि.प. सदस्य सुनंदाताई शिनगारे, विजय खरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे यांनी केले. प्रास्ताविक सागर पुरोहित यांनी केले. मेळाव्‍याआधी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीने अवघे चिखली शहर दुमदुमून गेले होते.

आ.सौ. श्वेताताई महाले यांच्या निवासस्थानी मान्यवरांची सदिच्छा भेट
मेळाव्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी आ. श्वेताताई महाले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्‍यांना आ. श्वेताताई महाले यांच्या वतीने राखी बांधण्यात आली. यावेळी मेळावा आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदार बाहेकर, योगेश राजपूत, विशाल विसपुते, विनायक भाग्यवंत, सिद्धेश्वर ठेंग, संदीप लोखंडे, योगेश झगडे, शंकर उद्रकर, कैवल्य कुळकर्णी, चैतन्य जोशी, अक्षय भालेराव, शैलेश सोनुने, प्रसाद ढोकणे, विष्णू मेथे, श्रीकांत शिनगारे, आकाश चुनावाले, नितीन पंजवाणी, आयुष कोठारी, श्रेयस शिसोदिया, मयूर गीते, विक्की साळवे, प्रशांत अक्कर, ऋषी सिताफळे, कपिल झगडे, स्वप्नील कुळकर्णी, शुभम शेळके, श्याम दिवटे, शुभम खबुतरे, विक्रांत महाजन, यश टिपारे, शंकर देशमाने, पियुष भिमेवाल, ऋषिकेश हिंगमिरे, वैभव ढोले, विनायक शिंदे, ऋषभ शर्मा, पार्थ व्यवहारे, विनायक शिंदे, वैभव कोरे, कुणाल नगरिया, उमंग पुरोहित, प्रथम कोठारी, नीलेश केनकर, श्रीपाद तुपकर, शिवम पांधी, सौरभ मालानी, लोकेश पवार, तनय बाहेती आदींनी पुढाकार घेतला.