बुलडाण्यात माजीमंत्री हंडोरेही म्‍हणाले,”…तर स्वबळाचा नारा सत्‍यात उतरू शकतो!’

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागासवर्गीय समाजावरील वंचित शिक्का पुसून काढण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. मागासवर्गीय हा जातिवाचक शब्द नसून, या समाजाला न्याय देण्यासाठी तयार झालेला शब्द आहे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. नाना पटोले यांनी आज स्वबळाचा नारा दिला आहे. संघटन मजबूत झालं आणि कार्यकर्ते मुख्य …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागासवर्गीय समाजावरील वंचित शिक्का पुसून काढण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. मागासवर्गीय हा जातिवाचक शब्द नसून, या समाजाला न्याय देण्यासाठी तयार झालेला शब्द आहे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. नाना पटोले यांनी आज स्वबळाचा नारा दिला आहे. संघटन मजबूत झालं आणि कार्यकर्ते मुख्य प्रवाहात आले तर स्वबळाचा हा नारा सत्यात उतरू शकतो, असेही ते म्‍हणाले.

जिल्हा काँग्रेसच्‍या विस्तारीत कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. बुलडाणा अर्बन रेसिडेंन्सी हाॅलमध्ये २९ जुलैला ही बैठक झाली. प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, सरचिटणीस श्याम उमाळकर, ज्‍येष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मणराव घुमरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मनिषा पवार, रशीदखाँ जमादार, रामविजय बुरंगले,  अनंतराव वानखेडे, स्वाती वाकेकर, दिलीपराव जाधव, मनोज कायंदे, अशोक दिवे, मीनल आंबेकर, पदम पाटील, अलका खंडारे, उषा चाटे, कैलास सुखदाने, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष दीपक मोरे आदींची उपस्थिती होती.

बैठकीला प्रकाश पाटील अवचार, शैलेश सावजी, अशोक पडघान, सतीश महेंद्रे, संजय पांढरे, अशोक अमनकर, चित्रांगण खंडारे, सुनिल सपकाळ, दीपक रिंढे, शैलेश खेडकर, राम जाधव, समाधान सुपेकर, राजू पाटील, सुनिल तायडे , अविनाश उमरकर, दत्ता काकस, गणेश पाटील, विष्णू पाटील कुळसुंदर, कलीम खान, दिलीप सानप, अर्जुन घोलप, डाॅ. इसरार जमादार, गौतम बेगानी, बद्री वाघ, सत्यजीत खरात, रमेश कायंदे, शेषराव सावळे, देवानंद पवार, श्लोकानंद डांगे, डिगांबर मवाळ, डाॅ. पुरुषोत्तम देवकर, शैलेश बावस्कार, ज्ञानेश्वर सुरोशे, प्रकाश बस्सी, संजय टेकाळे, रिजवान सौदागर, भूषण मापारी, प्रकाश अंभोरे, नीलेश हरकल, डाॅ संजय घुगे, भानुदास राऊत, शिवनारायण म्हस्के, डाॅ सत्येंद्र भुसारी, गौतम बेगानी, भारत म्हस्के , दिलीप पाटोकार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.