प्रसेनजीत पाटील यांचा याच आठवड्यात होणार राष्ट्रवादी प्रवेश, मुंबईत होणार सोहळा!

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर तरी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपेल असे वाटत असतानाच, या गटबाजीचा “मोठा’ फटका पक्षाला बसला आहे. घाटाखालील काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा पक्षातून बाहेर पडला असून, कापूस पणन महासंघाचे संचालक प्रसेनजीत दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. या आठवड्यातच मुंबईत पक्ष कार्यालयात अजितदादा आणि जयंत …
 

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नाना पटोले यांच्या दौऱ्यानंतर तरी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपेल असे वाटत असतानाच, या गटबाजीचा “मोठा’ फटका पक्षाला बसला आहे. घाटाखालील काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा पक्षातून बाहेर पडला असून, कापूस पणन महासंघाचे संचालक प्रसेनजीत दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या वाटेवर आहेत. या आठवड्यातच मुंबईत पक्ष कार्यालयात अजितदादा आणि जयंत पाटील यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत हा प्रवेश सोहळा होईल, अशी माहिती श्री. पाटील बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना दिली.

काल, १९ जूनला श्री. पाटील यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्‍याचे जाहीर केले. समाधान पाटील जिनिंग फॅक्‍टरीत झालेल्या कार्यकर्ता बैठकीत त्‍यांनी हा निर्णय बोलून दाखवत कार्यकर्त्यांच्‍या सूचना जाणून घेतल्या. २००९ व २०१४ मध्ये भारिप-बमसंच्‍या तिकिटावर प्रसेनजीत पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. २०१७ मध्ये त्‍यांनी मुकूल वासनिक यांच्‍या नेतृत्त्वात काँग्रेसप्रवेश केला होता. २०१९ च्‍या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळेल, अशी आशा त्‍यांच्‍या समर्थकांना होती. मात्र पक्षाने डावलले. त्‍यानंतरही सातत्‍याने श्री. पाटील आणि त्‍यांच्‍या समर्थक कार्यकर्त्यांची उपेक्षा पक्षात होत आहे. स्‍थानिक पदाधिकाऱ्यांनी त्‍यांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्‍न केल्याचा आरोप त्‍यांच्‍या समर्थकांनी केला आहे.

कार्यकर्त्यांच्‍या हितासाठी निर्णय
नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्‍या निवडणुका कार्यकर्त्यांच्‍या असल्याने त्‍यांच्‍या हितासाठी व पुढील राजकीय प्रवासासाठी काँग्रेसला राजीनामा दिला. शरद पवार यांचे विचार जन्‍मजात अंगी असल्याने या पक्षाची निवड प्रवेशासाठी केली.

– प्रसेनजीत पाटील