नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसचा खामगावमध्ये संकल्प मेळावा
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना आमदार नाना पटोले आज, १७ ऑगस्टला जिल्ह्यात असून, खामगाव शहरातील शेगाव रोडवरील राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवरच्या प्रांगणात दुपारी १ ला ते कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा घेणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी या मेळाव्यात संकल्प केला जाणार आहे. मेळाव्याला संपर्कमंत्री यशोमतीताई ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, ॲड. गणेश पाटील, विजय अंभोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, सौ. जयश्री शेळके, आमदार राजेश एकडे, कृष्णराव इंगळे, मनोज कायंदे, लक्ष्मणराव घुमरे यांच्यासह अन्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याचे आयोजन माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी केले आहे.