चिखली ः शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषाने दणाणले शहर!; दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल

चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 95 वी जयंती. जयंतीनिमित्त चिखली शहरात शिवसेना व युवा सेनेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले.सर्वप्रथम शिवसेना जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी, नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. नंतर शहरात भव्य रॅली काढून शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषाने शहर दणाणून सोडले. त्यानंतर चिखली शहर शिवसेनेतर्फे सात शिवसेना, …
 

चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आज हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 95 वी जयंती. जयंतीनिमित्त चिखली शहरात शिवसेना व युवा सेनेतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सर्वप्रथम शिवसेना जनसंपर्क कार्यालयात पदाधिकारी, नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. नंतर शहरात भव्य रॅली काढून शिवसेनाप्रमुखांच्या जयघोषाने शहर दणाणून सोडले. त्यानंतर चिखली शहर शिवसेनेतर्फे सात शिवसेना, युवा सेना शाखा नामफलकाचे अनावरण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. गांधीनगर, संत रविदासनगर शाखेतर्फे संत गजानन महाराज मंदिरात शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचे औचित्य साधून महाआरती घेऊन महाप्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना नेते सहसंपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते भास्करराव मोरे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख कपिल खेडेकर, शहर प्रमुख श्रीराम झोरे, युवासेना उपजिल्हा प्रमुख रोहीत खेडेकर, युवा सेना तालुकाप्रमुख, पं. स. सदस्य नंदु कर्‍हाडे, शहर संघटक प्रितम गैची, नगरसेवक दत्ता सुसर, माजी नगरसेवक श्याम शिंगणे, आनंद गैची, उपशहरप्रमुख समाधान जाधव, किसना कदम, मनोज वाघमारे, युवा सेनेचे रवी पेटकर, उपतालुका प्रमुख किसनराव धोंडगे, विलास सुरडकर, प्रल्हाद पाटील, किसना जाधव, युवा सेनेचे शुभम खरपास, मंगेश इंगळे, विशाल इंगळे, शहरातील बंटी कपूर, साजीदभाई, राजू झोरे, शिवा पाटील, किशोर महाले, उमेश झोरे, पप्पू परिहार, शेख बबलू शे.अयुब, सखाराम जाधव, ओंकार जाधव, विठ्ठल पिठले, सचिन झगरे, भगवान जाधव, पिंटू गायकवाड, अजय वानखेडे, विजय सुरुशे, सुनिल रगड, विजय जोशी, किशोर महाले, अजय काळे, शुभम डुकरे, अनंता सपकाळ, अमोल कांबळे, शंकर देशमुख, अनिल जावरे, रोहित घोलप, अभिजित सुरुशे, अमोल कांबळे, गोपाल निकाळजे, मंगेश उमक, आकाश गिर्‍हे, दीपक सोनवाल, लखन गैची, दिनेश गैची, शरद उकर्डे व शहरातील अनेक शिवसैनिक, युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.