चिखलीत भाजपच्या बॅनरवर राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा फोटो आला कसा?

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीत भाजपच्या महिला आघाडीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी तयार केलेल्या बॅनरवर भाजपच्या महिला नेत्यांबरोबर चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचाही फोटो छापून आला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून, हा फोटो नक्की आला कसा, याची चर्चा घडताना दिसून येत आहे. आज नगरसेविकेने खुलासा करून न विचारता फोटो छापल्याचा दावा केला असला तरी …
 
चिखलीत भाजपच्या बॅनरवर राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा फोटो आला कसा?

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीत भाजपच्या महिला आघाडीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी तयार केलेल्या बॅनरवर भाजपच्या महिला नेत्यांबरोबर चक्‍क राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचाही फोटो छापून आला. त्‍यामुळे शहरात खळबळ उडाली असून, हा फोटो नक्‍की आला कसा, याची चर्चा घडताना दिसून येत आहे. आज नगरसेविकेने खुलासा करून न विचारता फोटो छापल्याचा दावा केला असला तरी अशा पद्धतीने फोटो छापण्याची एवढी मोठी गडबड तरी अनावधानाने होऊ शकत नाही, असेही बोलले जात आहे.
चिखली नगरपालिकेत राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक आहेत. सौ. प्रभावती एकडे यांचा फोटो भाजपच्या बॅनरवर छापून आल्याने त्या आता लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आगामी नगरपालिका निवडणुकीपूर्वी त्या भाजपमध्ये प्रवेश घेऊ शकतात, अशीही कुजबूज सुरू झाली. मात्र प्रवेश घेण्यापूर्वीच फोटो छापून आल्याने त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. मला न विचारताच भाजपने फोटो छापल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले असले तरी एका हाताने टाळी वाजत नाही. उगाच कुणी फोटो छापेल का? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाकडून उपस्‍थित केला जात आहे. त्‍यामुळे बॅनरवरील फोटोचे गौडबंगाल कायम अाहे.