चिखलीत पंडितरावांचे “वरातीमागून घोडे’! नगर परिषदेतील गटनेत्‍याशी असमन्वयामुळे पक्षाची नाचक्‍की!; आधी नगरसेवक ठरावाला पाठिंबा देतात, नंतर तेच पुन्‍हा विरोधाचे निवेदन देतात…!!

चिखली (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली नगरपरिषदेतील सत्ताधारी भाजपातील असमन्वयाची कहानी पुन्हा एकदा समोर आली आहे. गटनेते आणि शहरप्रमुखांत समन्वयाची गरज असते. मात्र या ठिकाणी तो दिसून येत नसल्याने पक्षाची नाचक्की झाली आहे. ज्या ठरावाला सर्वसाधारण सभेत मान्यता दिली, त्याच ठरावाला नंतर विरोध करण्याचे निवेदन घेऊन भाजपा शहराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांचे दालन गाठले. ठरावाला …
 
चिखलीत पंडितरावांचे “वरातीमागून घोडे’! नगर परिषदेतील गटनेत्‍याशी असमन्वयामुळे पक्षाची नाचक्‍की!; आधी नगरसेवक ठरावाला पाठिंबा देतात, नंतर तेच पुन्‍हा विरोधाचे निवेदन देतात…!!

चिखली (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली नगरपरिषदेतील सत्ताधारी भाजपातील असमन्वयाची कहानी पुन्‍हा एकदा समोर आली आहे. गटनेते आणि शहरप्रमुखांत समन्वयाची गरज असते. मात्र या ठिकाणी तो दिसून येत नसल्याने पक्षाची नाचक्‍की झाली आहे. ज्‍या ठरावाला सर्वसाधारण सभेत मान्यता दिली, त्‍याच ठरावाला नंतर विरोध करण्याचे निवेदन घेऊन भाजपा शहराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांचे दालन गाठले. ठरावाला विरोध करण्याचे कारण जनहिताचे सांगितले जात असले तरी, त्‍यामागे राजकारण असल्याची चर्चा शहरात पसरली आहे. कारण ज्‍यांच्‍या अर्जावर ठराव घेतला गेला, ते अर्जदार माजी आमदारांचे बंधू आहेत..!

गेल्या काही दिवसांत चिखली नगरपरिषद विविध कारणांनी चर्चेत येत आहे. कधी घोटाळ्याच्या आरोपांनी तर पक्षांतर्गत राजकीय कुरघोडीने. आता चर्चेत येण्याचे कारण मात्र अजब आहे. ५ ऑगस्टला नगरपरिषदेची सर्वसाधारण बैठक झाली. शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी संरक्षक भिंत काढून टाकण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. आता हा ठराव रद्द करावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक पंडितराव देशमुख यांच्या नेतृत्वात भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे सर्वसाधारण सभेत या ठरावाला भाजप नगरसेवकांनी विरोधच केला नाही. त्यामुळे ते आता कुणाच्या तरी सांगण्यावरून विरोध करत आहे, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी दिली आहे. त्यामुळे चिखली नगरपरिषदेत पुन्हा एकदा भाजप शहराध्यक्ष विरुद्ध भाजप नगराध्यक्ष असा मुकाबला रंगला आहे. या मुद्द्यावर कोणती भूमिका घ्यावी, याबाबत मात्र नगरसेवकांची फरपट होत असल्याचे चित्र आहे.

सर्वसाधारण सभेत चिखली शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी संरक्षण भिंत काढून घेण्याबाबत जितेंद्र सिद्धीविनायक बोंद्रे यांच्या आलेल्या अर्जावर विचार करून निर्णय घेणे हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. याच ठरावाच्या विरोधात काल, ६ ऑगस्टला भाजपच्या शहराध्यक्ष व नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. ही जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी दान करण्यात आली आहे. त्यामुळे एकदा दान केलेली जागा पुन्हा परत घेणे म्हणजे नियतीत खोट आल्यासारखे आहे, असा आरोप भाजपच्या शहराध्यक्षांनी निवेदनात केला आहे. बांधण्यात आलेली संरक्षण भिंत ही जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरक्षेसाठी बांधलेली आहे. संरक्षक भिंत काढून टाकल्यास हा रस्ता सार्वजनिक होणार असून, यामुळे जलशुद्धीकरण केंद्रावर वर्दळ वाढेल. एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक हितासाठी संपूर्ण चिखली शहरातील लाखो नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. एखाद्या समाज कंटकाने जलशुद्धीकरण केंद्रामधील पाण्यात विषारी पदार्थ टाकल्यास संपूर्ण चिखली शहर वासियांच्या जीवाला धोका निर्माण होईल. यामुळे केवळ जलशुद्धीकरण केंद्राचीच सुरक्षा धोक्यात येणार नसून, चिखली शहरवासीयांचा जीव आणि आरोग्यसुद्धा धोक्यात येणार आहे. श्री सिद्धीविनायक काशीनाथ अप्पा बोंद्रे यांनी १९७४ साली ही जागा चिखली नगरपालिकेला जलशुद्धीकरण केंद्रासाठी उदात्त मनाने दान केलेली आहे. आता दान केलेली जमिनीवर बांधण्यात आलेली जलशुद्धीकरण केंद्राची भिंत हटविण्याची मागणी जितेंद्र सिद्धिविनायक बोंद्रे यांनी केली आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी भिंत तोडण्याबाबत झालेला ठराव रद्द करण्याची मागणी भाजपने केली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पंडितराव देशमुख, वजीरा बी शेख अनिस, सुदर्शन नारायण खरात, सौ. ममता शैलेश बाहेती सौ. रेवती रघुनाथ कुलकर्णी, गोविंद रामदास देव्हडे, सौ. विमल रामदास देव्हडे, विजय राजू नकवाल, सौ. अर्चना सतीश खबुतरे, नामदेव भारत गुरुदासानी, सौ. मंगला सुभाष झगडे, राजू प्रल्हाद गवई, सौ. हंसाताई राम अतार, अनुप अच्युतराव महाजन यांच्या सह्या आहेत.

ठराव मंजूर झाला तेव्हा आवाज का उठवला नाही ः नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे
नगरपरिषदेत जेव्हा ठराव मंजूर झाला तेव्हा या ठरावाला कुणीही विरोध दर्शविला नाही. यासंदर्भात सर्व नगरसेवकांशी आम्ही चर्चा केली. अर्ज केलेल्या व्यक्तीने जागेसंदर्भात कोणतेही दानपत्र दिलेले नाही. सातबाऱ्यावर त्यांचेच नाव आहे. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून बहुमताने ठराव मंजूर केला. यावेळी पंडितराव देशमुख वगळता कुणाचाही आक्षेप नव्हता. सभेचे सर्व पुरावे व्हिडीओ क्लिपिंग उपलब्ध आहेत. स्वतः भाजप गटनेत्यांनी ठरावाला पाठिंबा दिला. ठरावाला विरोध करायचा होता तर मंजूर का होऊ दिला? ठराव मंजूर नव्हता तर नगरसेवकांनी तेव्हाच विरोध करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली.

पंडितराव तुम्ही चुकलेच…
पंडितराव भाजपचे शहराध्यक्ष आहेत. नगरपरिषदेच्या कामकाजाचा त्यांना दीर्घकालीन अनुभव आहे. नगरपरिषदेत एखाद्या विषयावर पक्षाची भूमिका काय असावी यासाठी शहराध्यक्ष आणि गटनेत्यामध्ये समन्वय असणे आवश्यक असते. सर्वसाधारण सभेआधी नगरसेवकांची बैठक घेऊन पक्षाचे धोरणही ठरवले पाहिजे. मात्र तसे न झाल्यानेच भाजपची फसगत झाल्याचे दिसते. या सर्व प्रकारामुळे चिखली शहरात नेमकी सत्ता कोणत्या पक्षाची हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

मंजूर झालेल्या ठरावाचा लाभार्थी कोण?
चिखली शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळील जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी संरक्षक भिंत काढण्यासाठी जितेंद्र सिद्धीविनायक बोंद्रे यांनी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर विचार करून संरक्षण भिंत काढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. जितेंद्र बोंद्रे हे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे बंधू आहेत. विशेष म्हणजे सध्या भाजपच्या चिन्हावर नगराध्यक्ष असलेल्या प्रिया बोंद्रे पूर्वी काँग्रेसमध्येच होत्या. गेल्या काही महिन्यांपासून नगराध्यक्षपती कुणाल बोंद्रे आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांची जवळीक वाढली आहे.