शिवसेना प्रवेशाच्या आदल्या दिवशी प्राणघातक हल्ला, तरी ठरलेल्या वेळीच जखमी अवस्‍थेत बांधले शिवबंधन!; सिंदखेड राजा येथील घटना

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील उद्योजक गजानन मुंढे यांनी १० ऑक्टोबरला ठरलेल्या दिवशी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शिवसेना नेते बाबुराव मोरे, तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे, नगरसेवक राजेंद्र आढाव, …
 
शिवसेना प्रवेशाच्या आदल्या दिवशी प्राणघातक हल्ला, तरी ठरलेल्या वेळीच जखमी अवस्‍थेत बांधले शिवबंधन!; सिंदखेड राजा येथील घटना

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या सिंदखेड राजा तालुक्‍यातील पळसखेड चक्का येथील उद्योजक गजानन मुंढे यांनी १० ऑक्‍टोबरला ठरलेल्या दिवशी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शिवसेना नेते बाबुराव मोरे, तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे, नगरसेवक राजेंद्र आढाव, दामूअण्णा शिंगणे, महिला तालुका प्रमुख जयश्री कायंदे, बद्रीभाऊ बोडखे, दादासाहेब खार्डे, धनशिराम शिंपणे, छोटू पवार, योगेश म्हस्के, गणेश काकड, रमेश काकड, सुनील जाधव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर आंधळे यांनी मानले. शिवसेना प्रवेशाच्या एक दिवस आधी म्हणजे ९ ऑक्टोबरला रात्री साडेनऊला देऊळगाव राजा येथे त्‍यांच्‍यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी त्यांच्‍यावर लोखंडी रॉडने वार केले. त्यांच्या हाताला व डोक्याला जबर मार लागला होता. यामुळे जखमी अवस्थेतच त्यांनी नियोजित वेळी पक्षप्रवेश केला.