पलटवार… माजी आमदाराच्‍या आरोपांचे पोस्‍टमार्टम!; ‘अपने गिरेबान’में झांको…

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली, धाड येथे कोविड सेंटर सुरू करून कोरोना रुग्णांची मोफत सेवा सुरू केली आहे. वस्तुतः कोरोना नियंत्रणाची जबाबदारी राज्य शासनाची असतानाही आमदार सौ. महाले या कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता राज्य शासनाला मदत करत आहेत. चिखली येथे ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीमध्ये कोविड …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखलीच्‍या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी चिखली, धाड येथे कोविड सेंटर सुरू करून कोरोना रुग्णांची मोफत सेवा सुरू केली आहे. वस्तुतः कोरोना नियंत्रणाची जबाबदारी राज्य शासनाची असतानाही आमदार सौ. महाले या कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता राज्य शासनाला मदत करत आहेत. चिखली येथे ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीमध्ये कोविड हेल्थ सेंटरला मान्यता देण्यात आली. परंतु त्यासाठी जवळपास 50 लाखांचा खर्च दुरुस्तीसाठी शासन करत आहे. तसेच इतर पायाभूत सुविधांवर होणारा खर्च वेगळा. मनुष्यबळावर होणारा खर्च वेगळा असणार आहे. आमदार सौ. महाले यांच्या प्रयत्‍नांतून आधार सेंटर सुरू झाल्याने शासनाचा एक कोविड सेंटर चालविण्यासाठी लागणाऱ्या एकूण खर्चापैकी जवळपास 80 टक्‍के खर्च वाचलेला आहे. शासन औषधी व मनुष्यबळावर फक्त 20 टक्‍के खर्च करत करत असून, 80 टक्‍के खर्च आमदार सौ. महाले यांनी लोक सहभागातून उभारलेला आहे. त्यामुळे कोरोना संकटात शासनाच्या कामातील उणिवा दाखवताना आधार सेंटरच्या माध्यमातून शासनाला त्यांची मदतच होत असल्याचा दावा पंचायत समिती सभापती सौ. सिंधूताई तायडे यांनी माजी आमदारांच्‍या ‘सुविधा शासनाच्या श्रेय भाजपाचे’ या प्रसिद्धी पत्रकाच्या उत्तरादाखल केला आहे.

शासकीय सुविधा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी कुठे नाकारल्या नसून प्रत्येक प्रसिद्धी पत्रकात आणि भाषणातून सुद्धा त्यांनी आधार कोविड सेंटर हे शासन व लोक सहभाग यातून सुरू असल्याचे म्हटलेले आहे. एवढेच नव्हे तर ज्या वेळी आधार कोविड सेंटरला जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांना परवानगी मागितली, त्याच पत्रात मनुष्यबळ आणि औषधी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे शासनाच्या सुविधा मिळाल्या नाही असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर माजी आमदारांनी केलेला आरोप खोटा व बिनबुडाचा असल्याचेही सौ. तायडे यांनी म्हटले आहे. चिखली आणि धाड येथील कोविड केअर सेंटरला शासनाकडून केवळ मनुष्यबळाच्या नावावर डॉक्टर, नर्स व कोरोना प्रोटोकॉलप्रमाणे औषधी मिळालेली आहे. इतर मनुष्यबळ व महागडी औषधे संस्थेने उपलब्ध केली. सोबतच इतर बाबी जसे इमारत चिखली येथे नगरपालिकेची तर धाड येथे सहकार विद्या मंदिराची मिळालेली आहे. त्यातही या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक फिटिंग, स्वच्छता आणि रुग्णालयासाठी लागणाऱ्या सुविधा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी लोकसहभागातून तयार करून घेतल्या. यात शासनाचा एक रुपयासुद्धा सहभाग नाही. त्या व्यतिरिक्त कोविड केअरसाठी लागणाऱ्या बेडवर जवळपास 2 लक्ष रुपये खर्च केले. अंथरून, पांघरूण, जेवण, रोजची स्वच्छता, इतर व्यवस्था, रुग्ण शुश्रूषा, रुग्णांच्या इतर तपासण्या व चाचण्या, तेथील सर्व आधारभूत सुविधा तसेच तेथील सर्व व्यवस्थापन आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ व साहित्य हेही आमदार सौ. महाले पाटील यांनी स्वतः आणि लोकसहभागातून उभे केलेले आहे. वॉर्ड बॉय, स्वच्छता कामगार व तंत्रज्ञासह इतर मनुष्यबळ देण्याची शासनाची जबाबदारी असताना हे मनुष्यबळ उपलब्ध झालेलेच नसल्याने तेही आधार संस्थेने स्वतःच उभे केले आहे. या सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी लाखो रुपयांचा येणारा खर्च आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी लोकसहभागातून केलेला आहे. आधार सेंटर सुव्यवस्थित चालावे यासाठी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष पंडित देशमुख, नगरसेवक शैलेश बाहेती, गोविंद देव्हडे, श्याम वाकतकर दिवसरात्र झटत आहेत, असेही सौ. तायडे यांनी म्‍हटले आहे.

आधारमध्ये सर्व उपचार मोफत
सार्वजनिक आरोग्य राखणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. असे असताना आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी आधार कोविड सेंटरच्या माध्यमातून गोरगरिब रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात हा उदात्त हेतू ठेवलेला आहे. स्व दयासागरजी महाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुरू करण्यात आलेल्या आधार केअर सेंटरमध्ये रुग्णांना कोरोना प्रोटोकॉलप्रमाणे औषधोपचार तर मिळतच आहे. परंतु कोरोना सोबतच इतर काही आजारांसाठी शासनाकडून मिळत नसलेले फिजिशियन व MD डॉक्टरांची सेवा चिखली शहरातील नामांकित डॉक्टरांकडून घेऊन त्यांनी लिहून दिलेले औषधे आधार संस्थेमार्फत मोफत देण्यात येत आहे. आधारमध्ये रुग्णांना सकाळी प्रोटीनयुक्त न्याहारीमध्ये रोज मोड आलेले कडधान्य जसे मटकी, मूग, चवळी, चना , पोहा, उपमा व रोज अंडी, दुपारच्या जेवणात वरण, भात, भाजी व पोळी, दुपारी फळे व रात्री पुन्हा पौष्टिक जेवण असा आहार दिला जात आहे. रुग्णांच्या मनोरंजनासाठी भावगीते, सुगम संगीत, ऑर्केस्ट्रा , भजन , योगा , व्यायाम याची सुद्धा व्यवस्था संस्थेने सुरू करून कोविड केअर नाही तर रुग्ण केअर सेंटर संस्था चालवत आहे. या साठी एक रुपयाही घेतला जात नाही. सर्व उपचार व सुविधा मोफत दिल्या जात आहेत.

‘अपने गिरेबान’में झांको…
ज्यांनी भाजपा व आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्यावर आरोप केलेले आहे. त्यांनी अपने गिरेबानमें झाँकना जरुरी हैं… आरोप करणाऱ्यांजवळ सर्व पायाभूत सुविधा असताना कोरोना उपचाराच्या नावावर रुग्णांकडून पैसे घेतल्या जात आहेत. ऑक्सिजन प्लांट लावण्यासाठी लोकांकडून लोक वर्गणी करून त्या वर्गणीतून कोरोनाच्या नावावर पुढील धंद्याची तरतूद करून घेत आहे, असा आरोपही सौ. तायडे यांनी केला आहे.

ही तर बनिया गिरी…
रुग्णांकडून पैसे घेऊन उपचार करणे, ऑक्सिजन प्लांटच्या नावावर लोकवर्गणी जमा करणे यातून भविष्यातील व्यवसायाची तरतूद करणे म्हणजे सरळ सरळ बनियागिरी असून प्रत्येक गोष्टीचा धंदा कसा करता येईल आणि आपला स्वार्थ ( नफा) कसा मिळेल हा व्यावसायिक दृष्टीकोन आमदार सौ. महाले यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्या रक्तातच आहे. सेवा या शब्दाचा व माजी आमदार यांचा दुरान्वयाने ही संबंध नाही, असेही सौ. तायडे यांनी म्‍हटले आहे.

जनतेला लुटून मोठे झाले…
जे भाजपा व आमदार सौ. श्वेताताईंवर आरोप करत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभी राहिलेल्या जिल्हा बँकेचे कोट्यवधी रुपये हडप केले. साखर कारखान्याच्या व दूध डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून मिळविलेले शेअर्स डुबविले. एवढेच नव्हे तर कर्जमाफीत शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज दाखवून केंद्र व राज्य शासनाकडून घेऊन कर्जमाफी मिळवून घेतली. मात्र त्या कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांना न देता अनुराधा अर्बन बँकेलाच करून देऊन शासननालाच चुना लावलेला लावलेला आहे. आमदार असताना गरुडझेप प्रकल्प आमदार निधीतून राबवला. मात्र त्यासाठी सुद्धा लोक वर्गणी करून लाखो रुपयांचा निधी हडप केला. त्यामुळेच आरोप करणारे जनतेला लुटून मोठे झालेले आहे, असा आरोपही माजी आमदारावर करण्यात आला आहे.

चिखली उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची केलेली मागणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या
माजी आमदारांनी चिखली उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कडे केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. सोबतच कर्मचारी निवासस्थानी कोविड हेल्थ केअर सुरू करण्याची त्यांनी केलेली मागणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असून, आमदार सौ श्वेताताई महाले यांनी उपजिल्हा रुग्णालय व कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याच्या मागील आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत चिखलीकरांना पुन्हा एकदा हुल देण्याचा प्रकार आहे.