नाना पटोलेंच्‍या दौऱ्यात कोरोना नियमांचा भंग!; निर्बंधांचेही उल्लंघन, शेगाव, खामगावमध्ये गुन्‍हे दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नानांच्या दौऱ्यातून पक्षाला काय मिळाले, याचे उत्तर भले मिळणार नाही; पण कोरोनाविषयक नियमांना हरताळ फासून नेत्यांनी स्वतःच्या जिवाला धोका तर केलाच, पण आपल्या कार्यकर्त्यांचाही जीव धोक्यात घातला. काल, 10 जूनला बुलडाणा लाइव्हने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आज, 11 जूनला शेगावमध्ये 16 तर खामगावमध्ये 13 पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्ध कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नानांच्‍या दौऱ्यातून पक्षाला काय मिळाले, याचे उत्तर भले मिळणार नाही; पण कोरोनाविषयक नियमांना हरताळ फासून नेत्‍यांनी स्‍वतःच्‍या जिवाला धोका तर केलाच, पण आपल्या कार्यकर्त्यांचाही जीव धोक्‍यात घातला. काल, 10 जूनला बुलडाणा लाइव्‍हने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आज, 11 जूनला शेगावमध्ये 16 तर खामगावमध्ये 13 पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्ध कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्या प्रकरणी गुन्‍हे दाखल झाले आहेत. मात्र चिखलीत उत्तररात्री रंगलेल्या कार्यक्रमातील सहभागींविरुद्ध गुन्‍हा दाखल होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जिल्ह्यात दुपारी 4 नंतर निर्बंध लागू आहेत. असे असतानाही हा कार्यक्रम झाला, तेही गर्दीत!

गेल्या आठवड्यात भाजपाच्‍या ओबीसी मोर्चाने स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेतील आरक्षण टिकविण्यात राज्‍य सरकारला अपयश आल्याचा आरोप करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. हे आंदोलन विनापरवानगी झाले, शिवाय कोरोनाविषयक नियमांचा भंग झाला म्‍हणून बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्‍हे दाखल केले होते. त्‍याच्‍या काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध बुलडाण्यात काँग्रेसने निदर्शने केली होती. त्‍याही आंदोलनात तितकीच गर्दी आणि नियमांचा भंग झाला होता. तरीही गुन्‍हे दाखल झाले नव्‍हते. ही बाब भाजपाचे खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी उचलून धरत पटोले यांच्‍या दौऱ्यातही नियमांचे उल्लंघन झाल्‍याने गुन्‍हे दाखल करण्याची मागणी केली होती.

शेगाव शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांत तालुकाध्यक्ष विजय काटोले, पक्षनेते रामविजय बुरुंगले, खामगाव विधानसभेचे पक्षनेते ज्ञानेश्वर दादा पाटील, शेगाव पंचायत समितीचे माजी सभापती दयाराम वानखेडे, शैलेंद्र पाटील, जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे अस्लम खान, युवक काँग्रेसचे पवन पचेरवाल, शहराध्यक्ष दीपक सलामपुरिया, जिल्हा सरचिटणीस कैलास देशमुख, दिलीप पटोकार, सलमान राजा अस्लम शेख, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर शेजोळ, काँग्रेस सेवादलाचे अनिल सावळे यांचा समावेश आहे. खामगावमध्ये कोणत्‍या 13 पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्‍हे दाखल झाले हे वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही.

चिखलीचे काय?
नानांचा कार्यक्रम चिखलीत रात्री उशिरापर्यंत चालला. दुपारी 4 नंतर जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश असताना विनापरवानगी कार्यक्रम घेतला कसा आणि परवानगी असेल तर ती मिळाली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्‍हणजे या कार्यक्रमाची छायाचित्रे पाहिली तर गर्दीने कोरोनाविषयक नियमांचा भंग केल्याचेही दिसून येते. बुलडाण्यातही पहाटे 3 ला पोहोचलेल्या नानांच्या स्वागतासाठी 20 ते 25 कार्यकर्ते जमल्याचीही माहिती आहे. त्यातही विनामास्कचे फोटो आहेत. त्‍यामुळे चिखली आणि बुलडाण्यातही गुन्‍हे दाखल होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.