तीन दिवसांत ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर स्वाभिमानी उतरणार रस्‍त्‍यावर!; नेते रविकांत तुपकरांनी ठणकावले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीमुळे झालेल्या १०० टक्के नुकसानीने शेतकरी धाय मोकलून रडत असताना सरकार मात्र वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ओला दुष्काळ सरकारने जाहीर केला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा गर्भित इशारा नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. श्री. तुपकर म्हणाले, की १६-१७ ऑक्टोबरला झालेल्या …
 
तीन दिवसांत ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर स्वाभिमानी उतरणार रस्‍त्‍यावर!; नेते रविकांत तुपकरांनी ठणकावले!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिवृष्टीमुळे झालेल्या १०० टक्‍के नुकसानीने शेतकरी धाय मोकलून रडत असताना सरकार मात्र वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. त्‍यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. येत्‍या दोन-तीन दिवसांत ओला दुष्काळ सरकारने जाहीर केला नाही तर रस्‍त्‍यावर उतरण्याचा गर्भित इशारा नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

श्री. तुपकर म्‍हणाले, की १६-१७ ऑक्‍टोबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे उरले सुरले पीकही शेतकऱ्यांच्‍या हातून गेले आहे. शेतात नद्या तयार झाल्या आहेत. शेतकरी रडतोय. पण याकडे राज्‍य सरकारचे लक्ष नाही. सरकारने तोकडी मदत जाहीर केलेली आहे. तीही अद्याप मिळालेली नाही. सरकारला मदतीपासून पळ काढता येणार नाही. राज्‍य आणि केंद्र सरकारने मन मोठं करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. विनापंचनामे, कोणतेही निकष व अटी न लावता शेतकऱ्यांना भरीव मदत सरकारने तातडीने करावी. शेतकऱ्यांचा संयम संपत चालला आहे. आत्‍महत्‍या वाढण्याआधी सरकारने गंभीर होणे आवश्यक आहे. येत्या दोन- तीन दिवसांत ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्‍त्‍यावर उतरेल, असा इशारा श्री. तुपकर यांनी दिला आहे. पहा व्हिडिओ ः