२२ वर्षीय युवतीने अत्याचारी पित्याला जिवंत जाळले
कोलकाता येथील थरारक घटना; पोटच्या मुलीचे करत होता लैंगिक शोषण
कोलकाता : पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करणार्या अत्याचारी पित्याला २२ वर्षीय युवतीने दारू पाजून नंतर जिवंत पेटवून देऊन त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये कोलकाता शहरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी सदर युवतीस अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या युवतीला आई नव्हती. ती लहानपणीच वारली होती. तेव्हापासून ती तिच्या पित्याकडेच राहत होती. परंतु आईच्या मृत्यूनंतर पिता तिचे सातत्याने लैंगिक शोषण करत होता. दरम्यानच्या काळात तिचा विवाह झाला. त्यामुळे पित्याचे अत्याचर बंद झाले होते. पण तिचा पतीसोबत वादामुळे ती पुन्हा माहेरी येऊन राहिली. तेव्हा पित्याने अत्याचार करणे पुन्हा सुरू केले. यामुळे तिच्या मनात पित्याविषयी कमालीची घृणा निर्माण झाली होती.त्यातून ५६ वर्षीय पित्यासोबत तिनेकाही दिवसांपूर्वी बाहेर जेवण केले.त्यावेळी तिने पित्याला दारू पाजली. त्यानंतर ते दोघे हुगळी नदीच्या किनारी झोपी गेले. त्यानंतर काही वेळाने युवतीने पित्याच्या अंगावर तेल टाकून त्याला पेटवून दिले. ही घटना सीसीटीव्हीत वैâद झाली. शिवाय त्याबाबत एका नातेवाईकनेही ठाण्यात तक्रार दिली. त्यामुळे पोलिसांनी तपास करून आरोपी महिलेला अटक केली.तिने आपला गुन्हा कबूल केला असून अत्याचाराच्या तिरस्कारातून हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.