राष्ट्रीय बातमी : वारंवार दूध मागतो म्हणून मुलाला उचलून आपटले, जागीच मृत्यू

रायपूर : छत्तीसगढमधील कोरबामध्ये वारंवार दूध मागतो म्हणून जन्मदात्या आईने तीन वर्षांच्या चिमुकल्याला उचलून जमिनीवर आपटले. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी मुलाच्या आईला अटक केली आहे. प्रमिला असं या हिंसक आईचं नाव असून, मृत्यू झालेल्या मुलाच नाव सात्विक राव आहे. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. सकाळी आई मुलाला खाऊ घालत …
 
राष्ट्रीय बातमी : वारंवार दूध मागतो म्हणून मुलाला उचलून आपटले, जागीच मृत्यू

रायपूर : छत्तीसगढमधील कोरबामध्ये वारंवार दूध मागतो म्हणून जन्मदात्या आईने तीन वर्षांच्या चिमुकल्याला उचलून जमिनीवर आपटले. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी मुलाच्या आईला अटक केली आहे. प्रमिला असं या हिंसक आईचं नाव असून, मृत्यू झालेल्या मुलाच नाव सात्विक राव आहे. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. सकाळी आई मुलाला खाऊ घालत होती. मात्र सात्विक तिला वारंवार दूध मागत होता. त्यामुळे चिडलेल्या प्रमिलाने त्‍याला जोरात जमिनीवर आपटले. घरातल्या इतर सदस्यांना सात्विक जमिनीवर निपचित पडलेला दिसला. त्यांनी त्याला जवळच्या दवाखान्यात हलविले. मात्र सात्विकला डॉक्टरांनी मृत घोषित केले.