मैत्रिणीचा भाऊच करीत होता वर्षभर बलात्कार… शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन वारंवार कृत्‍य!

भोपाळ ः मैत्रीण सुखदुखात सहभागी असते, असं म्हणतात. तिच्याशी सर्व गोष्टी मोकळेपणानं शेअर करता येतात; परंतु भोपाळमध्ये उलटंच झालं. मैत्रिणीच्या भावाने एका युवतीवर बर्षभर बलात्कार केला. पीडिता तक्रार करायला गेली, तर माझ्या भावाविरुद्ध कुणाला सांगितलं, तर बदनाम करील, अशी धमकी दिली. पीडितेची मैत्रीण एवढ्यावर थांबली नाही, तर ती भोपाळहून पीडितेला इंदूरला घेऊन गेली. शीतपेयातून गुंगीचे …
 

भोपाळ ः मैत्रीण सुखदुखात सहभागी असते, असं म्हणतात. तिच्याशी सर्व गोष्टी मोकळेपणानं शेअर करता येतात; परंतु भोपाळमध्ये उलटंच झालं. मैत्रिणीच्या भावाने एका युवतीवर बर्षभर बलात्कार केला. पीडिता तक्रार करायला गेली, तर माझ्या भावाविरुद्ध कुणाला सांगितलं, तर बदनाम करील, अशी धमकी दिली.

पीडितेची मैत्रीण एवढ्यावर थांबली नाही, तर ती भोपाळहून पीडितेला इंदूरला घेऊन गेली. शीतपेयातून गुंगीचे आैषध देऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. हे वारंवार व्हायला लागल्यानं पीडितेला असह्य झालं. अखेर तिनं पोलिसांत धाव घेतली. तिथं पीडितेच्या मैत्रिणीविरुद्ध आणि मैत्रिणीच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडिता तीस वर्षांची आहे. ती गृहिणी आहे. तिची मैत्रीण पिंकी नेहमी घरी येत-जात होती. एकदा पिंकीनं तिचा भाऊ लोकेश रघुवंशी याच्याशी तिची ओळख करवून दिली. लोकेश इंदूरला राहतो.

त्याचं भोपाळला येण- जाणं असतं. यादरम्यान लोकेश महिलेच्या घरी यायला लागला. 7 जून 2020 रोजी दुपारी ती घरी एकटी होती. लोकेश तिच्या घरी आला. त्यानं दरवाजा आतून बंद केला. धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. बदनामीच्या भीतीनं ती शांत राहिली. दुसऱ्या दिवशी तिनं पिंकीला भावाच्या कृष्णकृत्याबद्दल सांगितलं, तर पिंकीनं भावाची साथ दिली. भावानं बरोबरच केलं. तो तुझ्यावर प्रेम करू लागला आहे. जर कोणाला याबाबत सांगितलं तर तुझी बदनामी करीन, अशी धमकी तिनं दिली. लोकेश त्यानंतर जेव्हा जेव्हा भोपाळला येत असे, तो पीडितेवर बलात्कार करीत होता. पिंकी भावाला साथ देत होती. गेल्या 10 तारखेला पिंकी काही कारण सांगून पीडितेला इंदूरला घेऊन गेली. पिंकी तिला थेट लोकेशकडे घेऊन गेली. लोकेशने कोल्ड ड्रिक्समध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर पुन्हा बलात्कार केला.