निर्दयी मुलाने कानशिलात मारताच वृद्ध आई गतप्राण
नवी दिल्ली : निर्दयी मुलाने क्षुल्लक कारणावरून वृद्ध आईच्या कानशिलात मारताच वृद्ध मातेने जागीच प्राण सोडले. ही घटना राजधानी दिल्लीतील द्वारका परिसरात घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर मुलावर जोरदार टीका होत असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. द्वारकाचे डीसीपी संतोषकुमार मीणा यांनी याबाबत सांगितले की, ही घटना १५ मार्च रोजी दुपारी बाराच्या सुमारास बिंदापूर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली.कुणी तरी फोन करून ही माहिती आम्हाला दिली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर प्राप्त माहितीनुसार सदर महिलेचा पार्विंâगच्या जागेवरून इमारतीच्या मालकासोबत वाद झाला होता. पण ते प्रकरण मिटले होते.पण नंतर भांडण उफाळले. त्यावेळी अवतार कौर (वय ७६,मृत महिला) आणि तिचा मुलगा रणबीर व सून यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात रणबीरने आई अवतार कौरच्या कानशिलात जोरदार थापड मारली.त्यामुळे त्या जागीच कोसळल्या. मुलाने व सुनेने तिला उठविण्याचा प्रयत्न केला. पण तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.घटना व्हायरल झाल्यानंतर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. नेटकर्यांनी त्या मुलाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.