तृतीयपंथीय उमेदवार ठरली आकर्षणाचे केंद्र
केरळमध्ये अनन्या कुमारीला आमदारकीचे वेध
तिरुअनंतपूरम : भारतीय राजकारणात आजवर काही तृतीयपंथीयांनी राजकारणात येण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशात शबनम मौसी ही तृतीयपंथी शहराची महापौरही झाली होती. पण काही अपवाद वगळता राजकीय क्षेत्र हे तृतीयपंथीयांसाठी वर्ज्यच ठरले होते.पण केरळमध्ये विधानसभा निवडणुकीत सध्या अनन्याकुमारी ही तृतीयपंथी महिला आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. निवडून यायचे, आमदार व्हायचे, लोकसेवा करायची व तृतीयपंथीदेखील चांगले नेता होऊ शकतात, हे समाजाला दाखवून द्यायचे असे तिचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी अनन्याकुमारीने केरळ विधानसभेसाठी एलेक्स वेंगारा मतदारसंघातून डामेस्टिक सोशल जस्टीस पार्टीतर्पेâ (डीएसजेपी) उमेदवारी दाखल केली असून ती सध्या दणक्यात प्रचार करताना दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत ती केरळमधील एकमेव तृतीयपंथी उमेवार ठरली आहे. आपण निवडणून येणारच असा विश्वास तिला आला आहे. तृतीयपंथी हे चांगले नेता, समाजसेवक ठरू शकतात, हे मला दाखवून द्यायचे आहे, असे अनन्याकुमारी सांगते. महिला व तृतीयपंथीयांची सुरक्षा याला माझे प्राधान्य असेल, असे तिने सांगितले. विशेष म्हणजे अनन्याकुमारी ही गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून महिलांच्या अधिकारांबाबतही ती सतत आवाज उठवत असते. तिने आजवर अनेक उपक्रम राबवले असून त्यासाठी तिला पुरस्कारही मिळाले आहेत.या कामाच्या आधारे लोक आपल्याला निवडून देतील, असा विश्वास तिला वाटत आहे.