ख्रिश्चन धर्मगुरूचा विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार; म्हणे, हा देवाचा प्रसाद!
रायपूर ः लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर ख्रिश्चन धर्मप्रसारकाने वारंवार लैंगिक अत्याचार केला. तिने विरोध केला तेव्हा हा देवाचा प्रसाद आहे, असे म्हणत त्याने तिची समजूत काढली. यातून ती गर्भवती राहल्याने हा प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपी धर्मप्रसारकाला अटक केली. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यातील गिदम शहरात हा प्रकार समोर आला आहे.
३५ वर्षीय विधवेच्या पतीचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर मुलीच्या उपचारासाठी तिला ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी मदत केली. विधवेला राहण्यासाठी घर दिले. तिचे धर्मपरिवर्तन करून घेतले. त्यानंतर चर्चचा पादरी बाबूलाला नाग (४३) याने विधवेला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तिने याबद्दल पादरीला विचारणा केली असता हा देवाचा प्रसाद आहे, असे म्हणून तिची समजूत काढली. वारंवार होणाऱ्या अत्याचारांतून ती गर्भवती राहली. गर्भपाताच्या गोळ्या दिल्यावर विधवेची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रकरणाची तक्रार दिली.