उमेदवारी न मिळाल्याने महिला प्रदेशाध्यक्षांनी केले मुंडण

केरळमध्ये काँग्रेस पक्षातील नाराजी चव्हाट्यावर तिरुअनंतपूरम : केरळसह पाच राज्यांत निवडणुकीची रणधुमाळी जोरात आहे. सोबतच पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पण केरळमध्ये उमेदवारी न मिळाल्याने संतापलेल्या महिला प्रदेशाध्यक्षांनी चक्क मुंडण करून घटनेचा निषेध केल्याने काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.काँग्रेस पक्षाच्या केरळमधील उमेदवारांची यादी नवी दिल्लीत जाहीर करण्यात आली. त्यात पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष लतिका सुभाष …
 

केरळमध्ये काँग्रेस पक्षातील नाराजी चव्हाट्यावर

तिरुअनंतपूरम : केरळसह पाच राज्यांत निवडणुकीची रणधुमाळी जोरात आहे. सोबतच पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पण केरळमध्ये उमेदवारी न मिळाल्याने संतापलेल्या महिला प्रदेशाध्यक्षांनी चक्क मुंडण करून घटनेचा निषेध केल्याने काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.काँग्रेस पक्षाच्या केरळमधील उमेदवारांची यादी नवी दिल्लीत जाहीर करण्यात आली. त्यात पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष लतिका सुभाष (वय ५६) यांचे नावच नव्हते.आपल्याला तिकीट मिळेल अशी आशा त्यांना होती.त्यांना एतूमनूर मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. पण ती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला. तसेच पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्षाने यावेळी महिलांवर अन्याय केला आहे. पक्षाने जाहीर केलेल्या यादीत महिला उमेदवारांची संख्या अगदीच नगण्य आहे. शिवाय आपल्यापेक्षा अनेक कनिष्ठ नेत्यांना तिकीट दिले. पण मला ते नाकारण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी डोक्यावरचे सगळे केस काढून चक्क मुंडणही केले. केरळ काँग्रेसकडून रविवारी ८६ जणांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यात केवळ ९ महिला आहेत. लतिका सुभाष या २०१८ पासून काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. राज्यात ६ एप्रिलरोजी मतदान होणार असून त्याआधीच पक्षात बंडखोरी चव्हाट्यावर आल्याने काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे.