घर बांधून देता देता तिच्या स्वप्नाचे इमले बांधले!; वारंवार बलात्कार करून नंतर केली जात पुढे!!
भोपाळ शहरातील रातीबड पोलिसांनी जितेंद्र पराशर या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 28 वर्षीय तरुणी भोपाळ महानगरपालिकेत कर्मचारी आहे. तिच्या घराचे बांधकाम जितेंद्र पराशर हा ठेकेदार करत होता. यातून त्यांच्यात ओळख झाली. गोड गोड बोलून पराशरने तिचे मन जिंकले. तिच्यावर प्रेम झाल्याचे सांगून त्याने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिलाही तो आवडला.
यातून दोघांत शरीरसंबंध प्रस्थापित झाले. वारंवार तिच्या घरी येऊन तो तिच्याशी संबंध ठेवू लागला. मात्र लग्न करण्याबद्दल नंतर तो काहीच बोलत नव्हता. तक्रार देण्याच्या दोन दिवसांपूर्वी तिने त्याला शरीर संबंधास नकार देऊन लग्न कधी करणार याबद्दल स्पष्टच विचारले.
तेव्हा त्याने नकार दिला. तू दलित जातीची आहेस. माझ्या घरच्यांचा लग्नाला विरोध आहे, असे म्हणत पराशर निघून गेला. त्यानंतर तो तिला टाळू लागला. त्याने फोन नंबरसुद्धा बदलला, असे तरुणीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच ठेकेदार पराशर फरारी झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.