पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात भारी! जगातील सर्वात लोकप्रिय नेते!! अमेरिका, फ्रान्स ,इटलीच्या नेत्यांनाही टाकले मागे

 
नवी दिल्ली : जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या एका जनमत चाचणीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक लोकप्रियता असलेल्या नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. अमेरिकेतल्या ग्लोबल लीडर अप्रोवल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टंटने हे सर्वेक्षण केले आहे.
जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत नरेंद्र मोदी यांनी ही लोकप्रियता मिळवली आहे. अमेरिका, रशिया, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह जगातील १३ देशातील नेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जास्त असल्याचे या सर्वेक्षणात म्हटल आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे दुसऱ्या तर इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी तिसऱ्या स्थानी आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे सहाव्या स्थानी आहेत. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे तळाशी म्हणजेच १३ व्या स्थानी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तब्बल ७१ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे.