NATIONAL NEWS बातमी तुमच्या आमच्या कामाची! घरगुती गॅस सिलेंडरचे दर कधी कमी होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी सरळ सरळ गणित सांगितलं; म्हणाले....

 
नवी दिल्ली( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): घरघुती गॅस च्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. सातत्याने गॅस  सिलिंडर च्या किमती वाढत आहेत. विरोधी पक्ष याबाबत आक्रमक भूमिका घेत असला तरी त्याचा म्हणावा तेवढा प्रभाव नसल्याने सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षांच्या आंदोलनाचा परिणाम होतांना दिसत नाही. मात्र असे असले तरी घरघुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी होण्याची आशा सामान्यांना आहे. गॅस सिलिंडर च्या किंमती कधी कमी होणार याबाबत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं मोठ विधान समोर आल आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झाल्यास एलपीजी गॅस सिलेंडरच्या कमी होतील असं पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलय.

 सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर हे ७५० डॉलर प्रति मेट्रिक टन एवढे आहेत. हे दर कमी झाल्यास घरगुती गॅस सिलेंडर कमी दरात उपलब्ध करून दिल्या जाईल असे पेट्रोलियम मंत्र्यांनी संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यावेळी आंतरराष्ट्रीय दर हे वेगवेगळ्या कारणांनी निश्चित केले जातात असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या घडीला सौदी अरेबियात गॅसच्या दरात ३३० टक्क्यांनी वाढ झाली मात्र त्या तुलनेत केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात कमी वाढ केली असेही पुरी म्हणाले. सौदी अरेबियाची दर कमी झाल्यास भारतात गॅस सिलेंडरचे दर कमी होतील असे पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केले.