National News : १६ वर्षीय मुलाची आत्महत्या; पंतप्रधान मोदींना चिठ्ठी लिहून म्हणाला, …तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल!
इंदौर : १६ वर्षीय मुलाने नैराश्यातून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्येपूर्वी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेली चिठ्ठी त्याच्या मृतदेहाजवळ सापडली. त्यात त्याने त्याच्या आत्महत्येचे कारण नमूद केले आहे. डान्सर होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथे ही घटना घडली आहे.
ग्वालीयरच्या मौनी बाबा मंदिर परिसरात राहणाऱ्या १६ वर्षांच्या अज्जूला डान्सर बनायचं होत. मात्र कुटूंबातील सदस्यांचा याला विरोध असल्याने तो सतत दुःखी रहायचा. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यामुळे त्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. मृतदेहाजवळ अज्जूने लिहिलेली सुसाईड नोट आढळली. त्यात त्याने थेट नरेंद्र मोदी यांच्याकडेच त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली आहे. सुसाईड नोटमध्ये अज्जूने लिहिले आहे, की मला केंद्र सरकारवर विश्वास आहे.
सरकारने माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी. माझ्या मृत्यूनंतर माझ्यावर एक गाणं तयार करण्यात यावं. डान्सर सुशांत खत्री यांनी गाण्याची कोरीओग्राफी करावी. देशातील सर्वात मोठे गायक अरजितसिंग यांनी त्या गाण्याचे गायन करावे. तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की, त्यांनी माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी. याशिवाय त्याने आई- वडिलांची देखील माफी मागितली. मी स्वार्थी आहे. मी चांगला मुलगा बनू शकलो नाही. मी डान्सर व्हायचे व्हायचे होते मात्र मला कुणी सपोर्ट केला नाही. मी माझ्या मृत्यूसोबत अनेक गुपित गोष्टी घेऊन जात आहे, असेही अज्जूने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.