National News : फाइव्‍ह स्‍टार हॉटेलमध्ये नाकारला साडी नसलेल्या महिलेला प्रवेश!

नवी दिल्ली : साडी नेसलेल्या एका महिलेला दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनिता चौधरी यांनी व्टिटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. दिल्लीतील अँकविला हॉटेलमध्ये साडी नेसलेल्या महिलेला प्रवेश दिला नाही. कारण साडी स्मार्ट कपड्यामध्ये येत नसल्याचे हॉटेलच्या व्यवस्थापनाचे म्हणणे …
 
National News : फाइव्‍ह स्‍टार हॉटेलमध्ये नाकारला साडी नसलेल्या महिलेला प्रवेश!

नवी दिल्ली : साडी नेसलेल्या एका महिलेला दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नेटकऱ्यांनी याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

अनिता चौधरी यांनी व्टिटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. दिल्लीतील अँकविला हॉटेलमध्ये साडी नेसलेल्या महिलेला प्रवेश दिला नाही. कारण साडी स्मार्ट कपड्यामध्ये येत नसल्याचे हॉटेलच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. स्मार्ट कपड्याची व्याख्या मला सांगा, मी साडी नेसन बंद करेन’ असं कॅप्शन अनिता चौधरींनी या व्हिडिओला दिलं आहे. १६ सेकंदांच्या या व्हिडिओत “साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही असा कुठं नियम आहे का’, असे प्रवेश नाकारण्यात आलेली महिला विचारते. त्यावर आम्ही फक्त स्मार्ट कपडे असणाऱ्यांना प्रवेश देतो. साडी हा स्मार्ट प्रकार नाही, असे हॉटेलच्या कर्मचाऱ्याने सांगितले.