National News : पित्याकडून मुलीवर लैंगिक अत्याचार ..राजकीय नेत्यांनीही उपभोगले;१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे २५ पेक्षा जास्त लोकांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप

लखनौ : उत्तरप्रदेशातील ललीतपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने जन्मदात्या वडिलांसह समाजवादी पार्टीच्या जिल्हाध्यक्षावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. आज तक या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे. मुलगी सहाव्या वर्गात होती. तेव्हापासून तिचे वडील तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक यादव यांनाही तिच्या वडिलांनी अत्याचार …
 
National News : पित्याकडून मुलीवर लैंगिक अत्याचार ..राजकीय नेत्यांनीही उपभोगले;१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे २५ पेक्षा जास्त लोकांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप

लखनौ : उत्तरप्रदेशातील ललीतपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने जन्मदात्या वडिलांसह समाजवादी पार्टीच्या जिल्हाध्यक्षावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. आज तक या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

मुलगी सहाव्या वर्गात होती. तेव्हापासून तिचे वडील तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक यादव यांनाही तिच्या वडिलांनी अत्याचार करायला लावला. याशिवाय बसपा जिल्हाध्यक्ष, एक अभियंता, समाजवादी पार्टीचे स्थानिक नेते आणि काही नातेवाइकांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. सहाव्या वर्गात असताना वडील मोबाइलमध्ये पॉर्न व्हिडिओ दाखवायचे. मुलीने विरोध केल्याने वडिलांनी तिला नवे कपडे आणले.

मोटारसायकल शिकविण्याचा बहाणा करून तिला शेतात नेले. तिथे अत्याचार करून कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर वारंवार अत्याचार होत होता. एक दिवस तिच्या वडिलांनी पाणीपुरीत गुंगीचे औषध टाकले. तिला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर एका जणाला लैंगिक अत्याचार करायला लावला. त्यानंतर अनेकदा वडिलांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करवून घेतल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. यात सपा जिल्हाध्यक्ष तिलक यादव, जिल्हाध्यक्षाचे भाऊ महेंद्र यादव, राजू यादव आणि अरविंद यादव यादव यांचा समावेश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.