तुम्हाला माहित आहे का? "या" देशात एकही साप आढळत नाही! कारण वाचून तुम्ही म्हणाल असही खरचं होऊ शकत..?
Jul 11, 2023, 11:29 IST
(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): साप म्हटल की कुणाच्याही अंगावर काटा उभा राहतो..आपल्या भारतात तर कोब्रा, घोणस, मण्यार, फुरसे असे घातक विषारी साप आढळतात..बिनविषारी सापांच्या तर कित्येक जाती आहेत. साप विषारी असो की बिनविषारी कसाही असला तरी तो अनेकांना घाम फोडतो..तर मुद्दा आहे तो ज्या देशात सापच नाही त्या देशाचा ..!
जगात जवळपास सगळ्याचं देशात वेगवेगळ्या जाती प्रजातींचे साप आहे. अमेरिकेत आढळणारा महाकाय ॲनाकोंडा तर सगळीकडे प्रसिद्ध आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात तर सापांच्या शेकडो जाती आहेत. मात्र जगाच्या पाठीवर एक देश असाही आहे ज्या देशात साप शोधूनही सापडणार नाही.
हो..आयर्लंड नावाचा तो देश. या देशात साप आढळत नाहीत. यामागील कारण पौराणिक असल्याचे तिथले स्थानिक सांगतात. या देशात सेंट पॅट्रिक नावाचे एक ख्रिस्ती धर्मगुरू होऊन गेले. लोकांना त्रास होऊ नये म्हणून धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी देशातील सगळे साप जमा केले आणि देशाच्या बाहेर समुद्रात फेकून दिले. सेंट पॅट्रिक यांनी ४० दिवस उपाशी राहून हे काम केल्याचे सांगितले जाते. मात्र वैज्ञानिकांना मात्र हे कारण मान्य नाही.
वैज्ञानिक काय म्हणतात?
आयर्लंड मध्ये साप नसण्यामागे सांगितली जाणारी धार्मिक बाब वैज्ञानिकांना मान्य नाही. वैज्ञानिक सांगतात की आयर्लंड मध्ये कधीच साप नव्हते. देशाच्या जीवाश्म विभागात देखील साप आढळल्याची एकही नोंद नाही. एका दुसऱ्या मान्यतेनुसार प्राचीन काळी या देशात साप होते मात्र कडाक्याच्या थंडीने ते नष्ट झाले.