"गाई दूध देईनात, त्‍यांना पोलीस ठाण्यात आणून समजवा...'

 
बंगळुरू ः कर्नाटकमध्ये एक विचित्र तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आलेल्या शेतकऱ्याची चर्चा होत आहे. शिवमोग्गा जिल्ह्यातील सिदलीपुरा गावातील रमय्या नावाच्या शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात येऊन गायींची तक्रार केली. गाई दूध देत नसल्याने त्‍यांना पोलीस ठाणून समजावा, असे आर्जव त्‍याने पोलिसांना घातले. त्‍यामुळे पोलीसही हैराण झाले.
रमय्याकडे चार गायी असून, त्‍या दूध देत नाहीत. त्‍यांना नियमित चारा, पाणी करूनही गायी दूध देत नसल्याने रमय्याने पोलीस ठाणे गाठले. तिथे सांगितले, की रोज सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी चार ते सहा या वेळेत गायी चरायला घेऊन जातो. पण चार दिवस उलटूनही गायी दूध देत नाहीत. या गायींना पोलीस ठाण्यात बोलावून घ्या आणि समजावून सांगा, असे रमय्या म्‍हणाला. त्‍याची तक्रार ऐकून पोलिसांनी डोक्‍यावर हात मारून घेतला. अशी प्रकारची विचित्र तक्रार दाखल करून घेता येणार नाही, अशी त्‍याची समजूत घातली. बराच वेळ समजावल्यानंतर रमय्या घरी परतल्याचे पोलिसांनी सांगितले.