पहिली असताना दुसरीशी कोर्ट मॅरेज करायला निघाला, पत्‍नीने येऊन धो धो धुतला!

 
पाटणा : पहिली बायको असतो तो दुसरीच्या प्रेमात पडला. तीही त्याच्या प्रेमात पडली. दोघांनी कोर्ट मॅरेज करायचं ठरवलं. तो कोर्ट मॅरेज करण्यासाठी निघाला. मात्र पहिल्या पत्नीला याची माहिती मिळताच तिने रस्त्यातच नवऱ्याला गाठले. तिने माहेरकडील लोकांना याची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी तिथे येऊन जावयाची यथेच्छ धुलाई केली. त्याला एका खांबाला बांधून ठेवलं. जोपर्यंत जावई सुधारत नाही तोपर्यंत त्याला सोडणार नाही, अशी भूमिका सासरकडील लोकांनी घेतली. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातल्या आजमनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मल्लिकपूर गावात हे प्रकरण समोर आले आहे. एका हिंदी वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मल्लिकपूर गावच्या आबिद खानचे सना खातून हिच्याशी लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस दोघांचा संसार ठीक होता. मात्र काही महिन्यांनंतर आबिद एका कंपनीत काम करायला मुंबईला गेला. तिथून तो पत्नीला पैसे पाठवत होता. मात्र २०२० नंतर त्याने घरी पैसे पाठवणे बंद केले. त्यामुळे पती- पत्नीत दुरावा आला. मुंबईत आबिदचे प्रेम दुसऱ्या मुलीवर जडले, असा आरोप सनाने केला. ही मुलगी आबिदच्या गावाशेजारी असणाऱ्या तेलता मधोपूर गावची आहे.

अनेकदा ती मुंबईला जात - येत होती. तिथे आबिदने तिच्यावर प्रेमाचे जाळे फेकले. त्यात ती अलगद अडकली आणि आबिदशी लग्न करायला देखील तयार झाली. तो प्रेयसीला घेऊन कोर्ट मॅरेज करायला जात होता. याची माहिती मिळताच सनाने कोर्टात पोहचण्याच्या आधीच आबिद आणि त्याच्या प्रेयसीला रस्त्यातच पकडले. तिने तिच्या माहेरच्यांना तिथे बोलावून घेतले. सर्वांनी मिळून आबिद खांबाला बांधला आणि यथेच्छ त्याची धुलाई सुरू केली.

आबिदच्या सासरकडील लोक म्हणतात, की त्याचे आणि सनाचे लग्न दोघांच्या इच्‍छेने लावून दिलं होत. मात्र आबिद आता दुसरीसोबत राहायचे म्हणतोय. तो त्याच्या बायकोशी नीट वागत नाही. त्याला अद्दल घडविण्यासाठी त्याला खांबाला बांधून मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आबिदची सुटका केली. मात्र आबिदच्या कोर्ट मॅरेजचा प्लॅन उधळला गेला. बिहारच्या कटीह्यार जिल्ह्यात या प्रकरणाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.