थरार... बायको गेली गावाला, संधी साधून सालीवर भावजीचा लैंगिक अत्‍याचार!; नंतर गळा चिरून पेटवून दिले!!

 
सिंगरौली : भावजीने सालीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशच्या सिंगरौली येथे समोर आला आहे. खून केल्यानंतर आरोपी भावजीने आग लावून मृतदेह पेटवून दिला. २७ मार्चच्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गण्यारी भागात २७ मार्चच्या मध्यरात्री २ वाजता एका  घराला आग लागून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता प्रीती यादव या महिलेचा मृत्यू झाला होता.

शवविच्छेदन अहवालात प्रितीच्या गळ्यावर आधी धारदार शस्त्राने वार करून नंतर तिचा मृतदेह जाळण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून याप्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. प्रीती ही तिची लहान बहीण आणि भावजीसोबत राहत होती. त्यामुळे पोलिसांना तिचा भावजी कृष्णकुमार यादव याच्यावर संशय आला.

कृष्णकुमारची कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. २५ मार्च रोजी प्रीतीची लहान बहीण गावाला गेली होती. त्या रात्री प्रीती आणि तिचा भावजी दोघेच घरात होते. त्यामुळे संधी साधून कृष्णकुमारने तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले.

घडलेली घटना कुणाला सांगू नको असे म्हणत त्याने प्रीतीची माफी मागितली. मात्र ती कधीतरी कुणाला सांगेलच असा संशय त्याला होता. त्यामुळे त्‍याने तिच्या हत्येचा कट रचला. २७ मार्चच्या मध्यरात्री तिचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल टाकले आणि घरातील गॅस सिलिंडर उघडून खोलीला आग लावली आणि तिथून फरारी झाला. अतिशय हुशारीने कट रचून त्याने पोलीस आणि कुटुंबियांचीसुद्धा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर त्याच्या पापाचा घडा भरला आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केले.