धक्कादायक! बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर चौघांनी केला सामूहिक बलात्कार! बॉयफ्रेंडला बेदम मारले, एकाला तर मिसरूडही फुटले नव्हते..

 
अंबिकापूर : बॉयफ्रेंड सोबत एकांतात फिरायला गेलेल्या तरुणीवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला . तरुणीच्या बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली..विशेष म्हणजे बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये एक अल्पवयीन मुलगा अवघ्या १२ वर्षांचा होता. पोलीसांनी बलात्कार करणाऱ्या चारही तरुणांना २४ तासांच्या आत अटक केली आहे. छत्तीसगढ राज्यातल्या अंबिकापूर मध्ये  दोन दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली आहे.

 प्राप्त माहितीनुसार १८ वर्षीय तरुणी तिच्या २० वर्षांच्या बॉयफ्रेंड सोबत एकांतात फिरायला गेली होती. अंबिकापूरला लागून असलेल्या डोंगरावर दोघे प्रेमीयुगल रात्री ८ वाजता बसलेले होते . त्याचवेळी तोंडावर रुमाल बांधलेल्या चौंघाची टोळी तिथे धडकली. दोघांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली..तरुणीला डोंगरावरच्या झाडीत नेऊन आधी दोघांनी व नंतर दोघांनी तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. तरुणीच्या बॉयफ्रेंडसोबतही अनैसर्गिक कृत्य केले. घटनेनंतर चौघांनी तिथून पळ काढला.

२४ तासांत आरोपी गजाआड

या प्रकारामुळे घाबरलेले व जखमी झालेली प्रेमीयुगल कसेबसे स्थानिक मणिपूर चौकी पोलीस ठाण्यात पोहचले. घटना पोलीस अधीक्षक भावना गुप्ता यांच्यापर्यंत पोहचली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पावले उचलली. आरोपींच्या शोधासाठी ५ पथके नेमण्यात आली. २४ तासांच्या आत सर्व आरोपींना अटक करण्यात आले असून चौघेही तरुणीच्या गल्लीत राहणारेच निघाले. अभिषेक यादव, नागेंद्र यादव, संतोष यादव अशी आरोपींची नावे असून एक आरोपी केवळ १२ वर्षांचा आहे. न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेमुळे छत्तीसगड मध्ये एकच खळबळ उडाली आहे.