National news धक्कादायक ! धावत्या कारमध्ये मायलेकीची इज्जत लुटली..! ६ वर्षांची चिमुकली गंभीर..!
प्राप्त माहितीनुसार पीडित महिला रात्री ८ वाजेच्या तिच्या मुलीसह एका धार्मिक स्थळावरून पायी घराकडे जात होती. काही अंतरावर गेल्यावर एका कारचालकाने कार थांबवून तिला लिफ्ट दिली. मात्र कारमध्ये आधीच तिघे - चौघे बसलेले होते. पीडित महिला कारमध्ये बसल्यावर आतील सगळ्यांनी तिचे व मुलीच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केली.
काहींनी पीडित मुलीच्या शरीराला वेगवेगळ्या ठिकाणी चावा घेतला.त्यानंतर पीडित महिला आणि चिमुकलीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. दोघींना गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला टाकून दिले. अशाही अवस्थेत मुलीचा जीव वाचवण्यासाठी धडपत महिला मुलीला घेऊन रुग्णालयात पोहचली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालय गाठले. पीडित मुलीवर सध्या उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेनंतर पोलिसांनी मध्यरात्री परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असून त्यावरून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे .