NATIONAL NEWS भाच्याचा मामीवर जडला जीव!इश्कात अडथळा ठरणाऱ्या मामाचा केला खून! मृतदेह शेतात पुरला; ७ महिन्यांनी उघडकीस आले कांड! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण..!

 
अबोहर(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पंजाबच्या अबोहर पोलीस स्टेशन हद्दीत एका वेगळीच प्रेमकहाणी समोर आली आहे. मामीचा अन् भाच्याचा जीव एकमेकांत गुंतल्याने दोघांच्या इश्कात अडथळा ठरणाऱ्या मामाचा त्यांनी गेम केला अन् मृतदेह शेतात पुरला.. यावर कळस म्हणजे खून करणाऱ्या मृतकाच्या पत्नीनेच पोलीस ठाण्यात धाव घेत नवरा बेपत्ता असल्याची तक्रार देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तब्बल ७ महिन्यानंतर आता या प्रकरणातील सत्य समोर आले असून पोलिसांनी मामी आणि भाच्याला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार चंद्रकला(२५) नावाच्या महिलेचे तिच्यापेक्षा ६ वर्षांनी लहान असलेल्या तिच्या भाचा सुनील सोबत अफेयर होते. तिचा भाचाही त्याच गावात राहत होता. सुनील गावात मजुरीचे काम करायचा तर चंद्रकला अधूनमधून शेतात चारा आणण्यासाठी जात होती. शेतातच दोघांचे चांगलेच सुत जुळले. चंद्रकला मामीच असल्याने सुनीलला तिच्या घरात बिनधास्त प्रवेश होता..शिवाय दोघांच्या वयात अंतर असल्याने कुणालाही त्यांच्यावर संशय नव्हता..!
 
नवऱ्याला ठेवू लागली दूर...!

दरम्यान चंद्रकला आणि सुनील यांच्यात प्रेम आता चांगलेच बहरू लागले होते. सुनील मध्ये जीव गुतल्याने चंद्रकला नवरा कृष्णालाल पासून स्वतःला दूर ठेवू लागली. रात्रीच्या वेळी ती नवऱ्याला शारीरिक संबधासाठी सुद्धा नकार द्यायची. बायकोत होत असलेल्या बदलांमुळे कृष्णलाल चिंतेत होता. याउलट बायकोची सुनील सोबत अधिकच जवळीक वाढत असल्याने त्याचा संशय वाढला. सुनील चे फोटो बायकोच्या फोन मध्ये असल्याने आता त्याची पक्की खात्री पटली होती. त्यावरून नवरा बायकोत सातत्याने भांडण होत होते. शेवटी इश्कात अडथळा ठरत असल्याने सुनील आणि चंद्रकला ने कृष्णलाल चा काटा काढायचे ठरवले. १५ जानेवारी २०२१ या दिवशी दोघांनी मिळून कृष्णलाल चा गळा आवळून खून केला. त्याचा मृतदेह शेतात पुरला.. दुसऱ्या दिवशी चंद्रकला ने पोलीस ठाण्यात नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
 
असे उघडकीस आले कांड...
 
नवऱ्याचा खून केल्यानंतर चंद्रकला आता बिनधास्त राहू लागली होती. सुनील चे येणे जाणे वाढले होते. कुटुंबीय बेपत्ता समजून कृष्णलाल चा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते.  मात्र चंद्रकला फारशी चिंतित दिसत नव्हती यासोबतच सुनील सोबतची जवळीक मृतक कृष्णलालच्या बहिणीला म्हणजेच सुनीलच्या मावशीला खटकली. तिला संशय आल्याने तिने पोलीस ठाण्यात आपल्या भावाचा खून झाला असावा असा संशय व्यक्त करून चंद्रकला आणि सुनीलच्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली. ही माहिती मिळताच चंद्रकला आणि सुनील दोघेही फरार झाल्याने पोलिसांची खात्री पटली. दोघांचा शोध घेतल्यावर एका शेतवस्तीवर दोघे सापडले. फरार झाल्यापासून मजुरी करून ते उदरनिर्वाह करू लागले होते. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.