NATIONAL NEWS आईस्क्रीमचे आमिष दाखवून ९ वर्षीय चिमुकलीवर आजोबांचा बलात्कार! नंतर दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या..!
प्राप्त माहितीनुसार मध्य प्रदेशातील हजारा येथे राहणारी ९ वर्षीय चिमुकली रविवार पासुन बेपत्ता होती. रविवारी दुपारी ती तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असताना तिच्या वडिलांचा मामा(४४) तिथे आला. तुला आईस्क्रीम घेऊन देतो असे म्हणत तिला घेऊन गेला.त्यानंतर मुलगी बेपत्ता झाली.
मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचा सगळीकडे शोध घेऊनही न सापडल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान मंगळवारी शहरातील रेल्वे पटरीच्या बाजूला मुलीचा मृतदेह आढळून आला. ज्या दगडाने ठेचून मुलीची हत्या करण्यात आली तो दगड मृतदेहाच्या बाजूला पडलेला होता.
तसेच मुलीच्या अंगावरील कपडे काढून तिला अर्धनग्न करण्यात आले होते. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मुलीच्या वडिलांचा मामा घटनेच्या दिवशी पासून बेपत्ता असल्याने त्यानेच हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.