त्याला मारहाण करून खोटा कॉल करत तिला बोलावून घेतले!; नंतर ७ जणांनी केला आळीपाळीने बलात्कार!!
पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात १७ जानेवारीला एक मैत्रीण व एका नातेवाइकासोबत लातेहार जिल्ह्यातील सुगा बांध येथे फिरायला गेली होती. त्यानंतर संध्याकाळी नातेवाइक युवकाने तिला घरी आणून सोडले होते. तो त्याच्या गावाला चंदावल येथे निघून गेला. त्यानंतर काही वेळाने मुलीच्या मोबाइलवर कॉल आला. घरी सोडणाऱ्या नातेवाइक तरुणाने सांगितले की, माझी मोटारसायकल खराब झाली आहे. तू इथे ये.
नातेवाइक तरुण अडचणीत असल्याचे पाहून मुलगी त्याने बोलावलेल्या ठिकाणी पोहचली. तेव्हा तिने पाहिले की सहा ते सात जणांनी नातेवाइक तरुणाला मारहाण करून फोन करून जबरदस्ती तिला तिथे बोलावले आहे. तिने पोलिसांना सांगितले, की त्याला मारहाण करून त्या सात जणांनी त्याला पळवून लावले. त्यानंतर सर्वांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.
हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.भीतीमुळे तिने घरी कुणालाही याबाबत सांगितले नाही. मात्र नातेवाइक तरुणाने दोन दिवसांपूर्वी याबाबत डूमरी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली. दरम्यान ही घटना उजेडात आल्यानंतर विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजपने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.आदिवासी मुख्यमंत्री असूनही राज्यात आदिवासींच्या मुली सुरक्षित नाहीत, असे भाजपने म्हटले आहे.