जोडप्यांना आता विमानातही करता येईल प्रेम!; मोजावे लागणार इतके रुपये..!!

 
लंडन ः आपल्या प्रेमाने उंच भरावी घ्यावी अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. जोडप्यांची ही इच्छा पूर्ण करण्याची तयारी एका एअरलाईन कंपनीने दाखवली आहे. काही पैसे मोजून आता जोडप्यांना हवेत प्रेम आणि शरीरसंबंध ठेवता येणार आहेत. अमेरिकेच्या लॉस वेगास या शहरात लव्ह क्लाऊड या विमान कंपनीनं ही ऑफर दिली आहे.

प्रवासात जोडप्याच्या प्रायव्हसीची योग्य ती काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन विमान कंपनीने दिले आहे. जवळपास पाऊण तासाच्या या प्रवासासाठी जोडप्यांना ९९५ डॉलर म्हणजेच ७४ हजार २७४ रुपये मोजावे लागणार आहेत. हे विमान लॉस वेगास वरून उड्डाण करेल. जोडप्यांचा खासगी वेळ जपण्यासाठी जागा पडद्यांनी बंद केली जाणार आहे. याशिवाय विमानाच्या पायलटला हेडफोन असल्याने त्याला आतील जोडप्यांचा आवाज ऐकू येणार नाही याचीही खबरदारी घेण्यात आली आहे.

पायलट कॉकपिटमध्येच राहील. त्याला जोडप्यांच्या आसपास भटकण्याची परवानगी नाही, असा नियम कंपनीने घालून दिला आहे. अमेरिकेत हल्ली घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकांना हवेत उड्डाण घेऊन शरीरसंबंध प्रस्थापित करू देण्याची अनोखी संधी देऊन त्यांचे नाते टिकविण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. याशिवाय ११९५ डॉलरमध्ये हवेतच लग्न समारंभ पार पाडण्याची ऑफर देखील या विमान कंपनीनं दिली आहे. यात अधिकचे १०० डॉलर जोडप्याने खर्च केल्यास जेवणाची सुविधा देखील पुरविण्यात येणार आहे. हवेत लग्न, त्यानंतर जेवण आणि हनीमून या तिन्ही गोष्टी  करायचा असतील तर जोडप्याला १५९५ डॉलर म्हणजे १ लाख २० हजार रुपये मोजावे लागणार आहेत.