हॉटेल बंद करण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या अंगावर फेकला उकळता चहा
कोरोनामुळे लागू संचारबंदीदरम्यान हॉटेलचालकचे कृत्य
भोपाळ : मध्य प्रदेशात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.त्यामुळे राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रात्री नऊ नंतर हॉटेल्स,बाजारपेठ बंद केली जात आहे. संचारबंदी लागू झाल्याने रात्री हॉटेल बंद करण्यासाठी फिरत असलेल्या पोलिसाच्या अंगावर हॉटेलचालक व त्याच्या मुलाने उकळता चहा फेकून नंतर दगडफेक केल्याची घटना शहरातील कांजीकॅम्प भागात घडली आहे. या घटनेत पोलीस अधिकार्यासह तीन पोलिस जखमी झाले आहेत.
हनुमानगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी महेदं्रसिंह ठाकूर यांनी सांगितले की, नाईट क़फर्यु सुरू असताना काजी वँâप भागात एक हॉटेल सुरू होते. पोलिसांनी ते बंद करण्यासाठी प्रयत्न केले असताना हॉटेल मालक व त्याच्या मुलाने त्यांच्या अंगावर उकळत्या चहाचे पातेलेच रिकामे केले. एवढेच नव्हे तर हॉटेल चालकाचे कुटुंब, मुले धावत आली व त्यांनी पोलसांवर दगडफेक केली. यात तीन जण जखमी झाले असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.