सुनेने दिली जाहिरात… सासूसाठी प्रियकर हवा, पण फक्‍त दोन दिवसांसाठी!

न्यूयॉर्क : कमी वयात सून विधवा झाली, तर तिचा पुनर्विवाह करून देण्यासाठी सासू पुढाकार घेते. कधी कधी एकाकी सासूच्या उतारवयात तिला पसंतीचा जोडीदार मिळावा म्हणून सून पुढाकार घेते. आपल्याकडेही असे प्रकार घडतात. त्यात नवल नाही. मात्र विदेशात घडलेल्या एका प्रकाराची चर्चा वेगळ्या कारणास्तव घडत आहे. कारण सुनेने दिलेल्या जाहिरातीत फक्त दोन दिवसांसाठीच सासूचा प्रियकर व्हावे …
 

न्यूयॉर्क : कमी वयात सून विधवा झाली, तर तिचा पुनर्विवाह करून देण्यासाठी सासू पुढाकार घेते. कधी कधी एकाकी सासूच्या उतारवयात तिला पसंतीचा जोडीदार मिळावा म्हणून सून पुढाकार घेते. आपल्याकडेही असे प्रकार घडतात. त्‍यात नवल नाही. मात्र विदेशात घडलेल्या एका प्रकाराची चर्चा वेगळ्या कारणास्तव घडत आहे. कारण सुनेने दिलेल्या जाहिरातीत फक्‍त दोन दिवसांसाठीच सासूचा प्रियकर व्हावे लागणार आहे. याचे कारण तिने जे दिले ते वाचून तुम्‍हीही परेशान व्हायल…

अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेने बाॅयफ्रेंड हवा, अशी जाहिरात दिली. मात्र बाॅयफ्रेंड तिला नको आहे. ती बाॅयफ्रेंड तिच्या सासूसाठी शोधते आहे. इथपर्यंत काही विवाद होण्याचं किंवा गंमत वाटण्याचं कारण नाही. पुढची जाहिरातील अट जास्त चर्चा घडवून गेली. सासूसाठी फक्त दोन दिवसांसाठी प्रियकर हवा आहे. प्रियकर खराखुरा नको तर बनावट असायला हवा. दोन दिवसांसाठी त्याला ७२ हजार रुपये मिळणार आहेत. त्या बदल्यात या प्रियकरानं काय करायचं काय तर ५१ वर्षांच्या सासूसोबत लग्नात आणि डिनरला उपस्थित राहायचं आहे. जाहिरात देणाऱ्या महिलेला एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहायचे आहे. लग्नाला सासूलाही बरोबर नेण्याची तिची इच्छा आहे. लग्नाच्या मेजवानीत सासू सुंदर कपड्यांत दिसली पाहिजे, अशी तिची इच्छा आहे. भाड्यानं घेतलेल्या बॉयफ्रेंडला दाम्पत्यासारखं वागावं लागेल. हा बनावट नवरा ४० ते ६० वर्षांच्या दरम्यान असावा, अशीही अट आहे.